सोनाक्षी आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांनी केले मोठे विधान, म्हणाले, त्यांचे लग्न अवैध…

काही दिवसांपूर्वीच सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी केले आहे. विशेष म्हणजे या लग्नाची जोरदार चर्चा देखील रंगताना दिसली. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. आता यावर शत्रुघ्न सिन्हा यांनी मोठे भाष्य केले आहे.

सोनाक्षी आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांनी केले मोठे विधान, म्हणाले, त्यांचे लग्न अवैध...
Sonakshi Sinha and Shatrughan Sinha
Follow us
| Updated on: Aug 13, 2024 | 1:26 PM

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी 23 जून 2024 रोजी लग्न केले. विशेष म्हणजे सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे हे सिव्हील मॅरेज होते. अगदी कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये यांनी लग्न केले. हेच नाही तर सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाला सिन्हा कुटुंबियांचा विरोध असल्याचे सांगितले जात होते. मात्र, लग्नामध्ये सही करताना सोनाक्षी सिन्हा हिने शत्रुघ्न सिन्हा यांचा हात पकडल्याचे बघायला मिळाले. लग्नानंतर रात्री धमाकेदार पार्टीचे आयोजन सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्याकडून करण्यात आले. आपल्या लग्नाच्या पार्टीमध्ये मस्त धमाल करताना सोनाक्षी सिन्हा ही दिसली. या पार्टीला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी देखील लावली.

झहीर इक्बाल याच्यासोबतच्या लग्नामुळे सोनाक्षी सिन्हा हिचे दोन्ही भाऊ नाराज असल्याचे बघायला मिळतंय. लव आणि कुश हे लग्नामध्येही उपस्थित नव्हते. अनेकांनी सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे लग्न लव्ह जिहाद असल्याचे देखील म्हटले. अनेकांनी झहीर इक्बाल याच्यासोबतच्या लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा हिला देखील टार्गेट करण्यास सुरूवात केली.

आता पहिल्यांदाच सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाबद्दल थेट भाष्य करताना शत्रुघ्न सिन्हा हे दिसले आहे. नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, मुळात म्हणजे हा लग्नाचा विषय आहे. त्यांनी लग्न केले आहे ते अवैध नाहीये. मी झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाला सपोर्ट करतो. मी आणि माझी पत्नी पूनम सिन्हा यांनी मुलीच्या लग्नात धमाल केली.

नेहमीच पालक हे आपल्या मुलांच्या आनंदात सहभागी असतात. आम्हाला वाटते की, आमचे मुले एकमेकांसोबत खूप आनंदी आहेत आणि ते एकमेकांसाठीच आहेत. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे लग्न चर्चेत राहिले. त्यांनी अगोदर लग्न केले आणि त्यानंतर एका मोठ्या पार्टीचे आयोजनही केले. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाबद्दल पहिल्यांदाच भाष्य करताना शत्रुघ्न सिन्हा हे दिसले.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी सात वर्षे एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर लग्न करण्याचा यांनी निर्णय घेतला. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांची पहिली भेट ही सलमान खान याच्या घरी झाली. विशेष म्हणजे कित्येक तास हे दोघे एकमेकांसोबत गप्पा मारत बसले होते. सोनाक्षी सिन्हा ही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. विशेष म्हणजे सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.