AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवऱ्यासाठी ती फक्त एक ट्रॉफी…, प्रसिद्ध अभिनेत्रीवर दुसऱ्या बायकोचा टॅग… लग्नानंतर खडतर झालेलं आयुष्य, कोणी केलेला धक्कादायक खुलासा?

अभिनेत्री बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचली, पण खासगी आयुष्यात मात्र तिने अनेक उतार - चढाव पाहिले..., तिच्यावर लागला दुसऱ्या बायकोचा टॅग... नवऱ्यासाठीतर ती फक्त एक ट्रॉफी होती...

नवऱ्यासाठी ती फक्त एक ट्रॉफी..., प्रसिद्ध अभिनेत्रीवर दुसऱ्या बायकोचा टॅग... लग्नानंतर खडतर झालेलं आयुष्य, कोणी केलेला धक्कादायक खुलासा?
| Updated on: Apr 11, 2026 | 1:06 PM
Share

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांना दुसऱ्या बायकोचा टॅग मिळाला… बॉलिवूडमध्ये अभिनेत्री यशाच्या शिखरावर तर पोहोचल्या, पण खासगी आयुष्यात मात्र त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला… लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात वैवाहिक आयुष्याचं सुख देखील फार काळ टिकलं नाही.. अखेर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला… असंच काही बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रीसोबत देखील झालं आहे. पहिला साखरपुडा मोडल्यानंतर अभिनेत्रीने, एका उद्योजकाची दुसरी पत्नी होण्याचा निर्णय घेतला. पण लग्नानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात मोठं संकट आलं.. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री करिश्मा कपूर आहे.

अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर करिश्मा हिने दिल्ली येथील उद्योजक संजय कपूर याच्यासोबत मोठ्या थाटात लग्न केलं. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. अशात संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांचा घटस्फोट का झाला? यामागचं मोठं कारण दिग्दर्शक सुनिल दर्शन यांनी केलं आहे.

एका मुलाखतीत सुनिल दर्शन यांनी करिश्मा हिची आई बबीता कपूर यांचं कौतुक केलं… बबीता यांची इच्छा होती की, करिश्मा हिने बॉलिवूडची टॉप अभिनेत्री म्हणून करियर करावं… त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत देखील घेतली… शिवाय सुनिल याने संजय – करिश्मा यांच्या लग्नावर देखील मोठं वक्तव्य केलं…

सुनिल दर्शन म्हणाले, ‘करिश्मा आणि संजय याची बहीण दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या… दिल्लीत करिश्माचं येणं – जाणं देखील वाढलं होचं. पण संजय याच्यासोबत तिला कधीच स्पॉट करण्यात आलं नाही… मला असं वाटतं की, दोघांच्या लग्नाचा निर्णय अचानक घेण्यात आला…’

‘संजय याच्यासोबत लग्न झाल्यानंतर करिश्मा हिने गृहिणी होण्याचा निर्णय घेतला… पण काही वर्षांनंतर करिश्मा फक्त घरातील बाहुली म्हणून राहिली. ती अशा लोकांपैकी एक नव्हती, जिला शनिवारी रात्री गोल्फ खेळायला आवडेल… तिला कुटुंबियांसोबत वेळ व्यतीत करणं फार आवडतं… ‘

जेव्हा सुनील यांना विचारण्यात आलं की, ‘संजय याच्यासाठी करिश्मा फक्त एक ट्रॉफी होती?’ यावर सुनील स्पष्ट म्हणाले की, ‘मला असं वाटतं हो… येथूनच त्यांच्या नात्यात दुरावा येण्यास सुरुवात झाली… करिश्मा एका अशा जगात, त्यामध्ये ती स्वतःची राहिली नाही… दिल्ली येथील वातावरण तिच्यासाठी फार वेगळं होतं आणि त्यामध्ये ती राहू शकली नाही…’

करिश्मा हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, घटस्फोटानंतर अभिनेत्रीने दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. अभिनेत्रीने दोन मुलांचा सिंगल मदर म्हणून सांभाळ केला. धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी संजय कपूर याचं निधन झालं.

Follow Us
खरात मुस्लिम असता तर त्याची.... बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ
खरात मुस्लिम असता तर त्याची.... बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ.
खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये-सुळेंचा तीव्र संताप
खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये-सुळेंचा तीव्र संताप.
अजित पवार यांचा फोन सापडला ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार?
अजित पवार यांचा फोन सापडला ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार?.
बारामती पोटनिवडणुकीत 22 अपक्षांमुळे लढत चुरशीची; सुनेत्रा पवार मैदानात
बारामती पोटनिवडणुकीत 22 अपक्षांमुळे लढत चुरशीची; सुनेत्रा पवार मैदानात.
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा.
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने..
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने...
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.