पोटची लेक गेली, कोसळला दु:खाचा डोंगर, शेफाली जरीवालाच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा फोटो
अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे निधन झाले आहे. तिच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार केले जातील. तिच्या अकाली जाण्याने बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Shefali Jariwala Death News : काटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे निधन झाले आहे. मृत्यूसमयी ती अवघ्या 42 वर्षांची होती. तिच्या अकाली निधनानंतर संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा व्यक्त केली जात आहे. शवविच्छेदनानंतर तिच्यावर आजच (28 जून) मुंबईत अंत्यसंस्कार केले जातील. दरम्यान, शेफालीच्या निधनानंतर तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शेफालीच्या आईचे हृदय पिळवटून टाकणारे फोटो समोर आल आहेत.
पतीला भावना झाल्या अनावर
शेफाली जरीवालाचा कार्डियाक अरनेस्टने मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र तिच्या मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदनाच्या रिपोर्टमधून समोर येणार आहे. प्रकृती बिघडल्यानंतर शेफालीच्या पतीने तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, शेफालीच्या मृत्यूनंतर तिच्या पतीला भावना अनावर झाल्या असून परागला रडू कोसळल्याचे काही फोटो समोर आले आहेत.
View this post on Instagram
शेफालीच्या आईलाही भवना अनावर
शेफालीचे तिच्या आईवर फार प्रेम होते. याआधी सोशल मीडियावर शेफालीने तिच्या आईसोबत अनेक फोटो शेअर केलेले आहेत. विशेष म्हणजे शेफाली आणि तिची आई सुनिता जरीवाला या दोघी सोबत अनेकदा फिरायलाही गेलेल्या आहेत. आता मात्र शेफाली या जगात नाही. आपली लेक हे जग सोडून गेल्याचं दु:ख सुनिता जरीवाला यांना आवरलेलं नाही. मुलीचा मृत्यू झाल्याचे समजताच त्यांना रडू कोसळलंय. त्यांचे हृदय पिळवटून टाकणारे काही फोटो समोर आले आहेत.
View this post on Instagram
अनेक चित्रपटांत केलं काम
दरम्यान, शेफालीवर आजच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. काटा लगा या गाण्यामुळे ती घराघरात पोहोचली होती. तिचे इन्स्टाग्राम यासारख्या समाजमाध्यमावर लाखो फॉलोअर्स होते. तिने मुझसे शादी करोगी, शैतानी रस्मे, बेबी कम ना, बू अशा अनेक चित्रपटांत काम केलेलं आहे. या चित्रपटांत तिने केलेल्या कामाची चांगलीच प्रशंसा झाली होती.
