AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Raaz | छेडछाड प्रकरण महागात, अभिनेता विजय राजची चित्रपटातून हकालपट्टी!

विजय राजच्या या प्रकरणानंतर चित्रपटाची बदनामी नको व्हायला, असे कारण देत निर्मात्यांनी त्याला बाहेरचा रस्ता दाखवल्याचे कळते आहे.

Vijay Raaz | छेडछाड प्रकरण महागात, अभिनेता विजय राजची चित्रपटातून हकालपट्टी!
| Updated on: Nov 05, 2020 | 1:34 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विजय राज (Actor Vijay Raaz) याला आगामी चित्रपट ‘शेरनी’ (sherni) मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ‘शेरनी’ चित्रपटाच्या सेटवर एका क्रू-मेंबरची छेड काढल्याचा आरोप विजय राजवर करण्यात आला होता. याप्रकारानंतर गोंदियातून विजयला अटक करण्यात आली होती. त्यानंतर काहीवेळातच त्याचा जमीन मंजूर झाला होता. मात्र, हे प्रकरण आता विजय राजला चांगलेच महागात पडले आहे. ‘शेरनी’च्या निर्मात्याने या चित्रपटातून विजय राजची हकालपट्टी केल्याचे कळते आहे (Sherni Film makers removed actor Vijay Raaz From movie after arrest).

विजय राजच्या या प्रकरणानंतर चित्रपटाची बदनामी नको व्हायला, असे कारण देत निर्मात्यांनी त्याला बाहेरचा रस्ता दाखवल्याचे कळते आहे. निर्मात्यांना चित्रपट तयार होण्यापूर्वी कुठलेही वाद निर्माण करायचे नाहीत. म्हणूनच इतके कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. तसे, आता त्याच्या जागी दुसऱ्या अभिनेत्याची वर्णी लागणार असल्याचेदेखील म्हटले जात आहे.

चित्रपटाला आर्थिक भुर्दंड

माध्यमांच्या अहवालानुसार, विद्या बालन अभिनित ‘शेरनी’ या चित्रपटातून विजय राजला वगळल्यानंतर निर्मात्यांना दर दिवशी सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या शेड्युलमध्येच विजय राजचे अधिक काम होते. त्याच्यासोबत चित्रित झालेली काही दृश्ये पुन्हा चित्रित करावी लागणार आहेत. (Sherni Film makers removed actor Vijay Raaz From movie after arrest)

तब्बल 22 दिवस विजय राजचे चित्रीकरण चालणार होते. दिवसाला 20 लाख प्रमाणे, जवळपास 2 कोटी रुपयांचा भुर्दंड ‘शेरनी’ चित्रपटाच्या निर्मात्यांना बसणार आहे. तसेच या चित्रपटातून विजय राजला काढल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Vijay Raaz | विनयभंगाच्या आरोपाखाली अटक झालेल्या ‘कौआ बिर्याणी’ फेम अभिनेता विजय राजला जामीन!

काय आहे प्रकरण?

अभिनेत्री विद्या बालन प्रमुख भूमिका साकारत असलेला आगामी चित्रपट ‘शेरनी’ची चित्रीकरण सध्या मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात सुरू आहे. या चित्रपटात विनोदी अभिनेता विजय राजदेखील (Actor Vijay Raaz) महत्त्वाची भूमिका सकारात होते. मात्र, या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान त्यांच्यावर छेडछाडीचा आरोप लावण्यात आला होता. क्रू मेंबरमधल्या 30 वर्षीय युवतीची छेड काढल्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल करून विजय राजला अटक (Arrested) करण्यात आली होती.

‘शेरनी’ चित्रपटाचे सर्व कलाकार आणि स्टाफ हे गोंदियातील प्रसिद्ध हॉटेल ‘गेटवे’ येथे मागील पंधरा दिवसांपासून वास्तव्यास आहेत. चित्रिकरणादरम्यान आणि हॉटेलमध्ये अभिनेता विजय राज यांनी आपली छेड काढल्याचे पीडित तरुणीने म्हटले आहे. युवतीची छेड काढल्याच्या तक्रारीवरून गोंदियातील रामनगर पोलीसांनी विनयभंग केल्याप्रकरणी कलम 354 (अ,ड) अन्वये गुन्हा दाखल करुन विजय राज यांना अटक केली होती. मात्र, काहीवेळानंतर त्यांना जामीन मंजूर करत, सोडण्यात आले होते.

दरम्यान, चित्रपटांत आपल्या अचूक टायमिंगमुळे विनोदी अभिनेता अशी ख्याती मिळवलेल्या विजय राज यांच्यावर अशा प्रकार आरोप झाल्यामुळे आणि त्यांना अटक झाल्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती.

(Sherni Film makers removed actor Vijay Raaz From movie after arrest)

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.