मला एक जोडीदार हवाय….प्रसिद्ध अभिनेत्री पुन्हा प्रेमाच्या शोधात, 52 व्या वर्षी नवरी होणार?
प्रसिद्ध अभिनेत्री शीबा चड्ढा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. त्यांनी 52 व्या वर्षी देखील प्रेमात पडण्याची आणि जोडीदार असण्याची इच्छा व्यक्त केली आहे.तसेच प्रेमात पडल्यानंतर त्यांना आलेला अनुभव देखील शीबा यांनी व्यक्त केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शीबा चड्ढा या सहजतेनं अभिनय करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी सर्वोत्तम चित्रपट दिले आहेत. प्रत्येत भूमिकेत त्यांनी काहीना काही नवीन प्रेक्षकांना दिलं आहे. शिबा त्यांच्या व्यैयक्तित आयुष्यामुळे देखील बऱ्याच चर्चेत असतात. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीमुळे पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत. अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले. मुलाखतीदरम्यान शिबाने तिच्या आयुष्याच्या बरेचसे पैलू बोलून दाखवले. तसेच प्रेमाबद्दलचा तिचा अनुभव देखील तिने सांगितला आहे.
आयुष्यात प्रेमाला दुसरी संधी द्यायची आहे का
मुलाखतीदरम्यान शीबाला हे विचारण्यात आलं की तिला तिच्या आयुष्यात प्रेमाला दुसरी संधी द्यायची आहे का? यावर शीबा म्हणाल्या, ‘ मला एक जोडीदार हवा आहे. आणि जरी मी लग्न केलं तरी मी कोणत्याही पुरुषासोबत एकाच घरात स्थिर राहू शकत नाही. री मी माझ्या घरातच राहीन आणि त्याला त्याची जागा देईन.’ त्यामुळे त्यांना हवा तसा जोडीदार मिळाला तर अभिनेत्री नक्कीच लग्नाचा विचार करेल असं दिसून येत आहे.
View this post on Instagram
मी 11 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते….
तसेच त्यांनी त्यांच्या एका नात्याबद्दलही सांगितलं की, त्या 11 वर्षांपासून एका नात्यात होत्या आणि ते नातं नंतर तुटलं. त्या म्हणाल्या की, “मी 11 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. पण जेव्हा ते तुटले तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मी अशा महिलांपैकी एक आहे ज्या खूप प्रेम देतात.” तसेच त्या म्हणाल्या की त्या यावर अधिक काही बोलू शकत नाही.
शीबा सिंगल मदर आहे
शीबा चढ्ढा यांनी १९९६ मध्ये चित्रपट निर्माते आकाशदीप साबीरशी लग्न केले. लग्नाच्या काही वर्षांनी त्यांच्या नात्यात मतभेद निर्माण होऊ लागले आणि ते वेगळे झाले. शीबा सिंगल मदर आहे. आणि तिची मुलगी नूरवर खूप प्रेम करते तसेच तिच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्यासाठी ती प्रयत्न करत असते. आता तिची मुलगी 20 वर्षांची झाली आहे.
