AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ अभिनेत्रींनी मोडला श्रीमंत पुरुषांचा संसार, त्यानंतर केलं लग्न, एकीची सवत तर प्रसिद्ध अभिनेत्री

Actress Life | बॉलिवूडच्या अभिनेत्री विवाहित पुरुषांना अडकवलं प्रेमाच्या जाळ्यात, त्यानंतर केलं लग्न, एकीला लग्नाच्या 44 वर्षांनंतर देखली नाही सासरी प्रवेश... तर एकीची सवत होती प्रसिद्ध अभिनेत्री... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रींच्या खासगी आयुष्याची चर्चा...

'या' अभिनेत्रींनी मोडला श्रीमंत पुरुषांचा संसार, त्यानंतर केलं लग्न, एकीची सवत तर प्रसिद्ध अभिनेत्री
| Updated on: May 13, 2024 | 11:36 AM
Share

बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात. बॉलिवूडच्या काही अभिनेत्री अशा आहेत, ज्या फक्त त्यांच्या कामामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत आल्या. सोशल मीडियावर देखील त्यांच्या खासगी आयुष्याची तुफान चर्चा रंगलेल्या असतात. बॉलिवूडमध्ये काही अशा अभिनेत्री आहेत, ज्या आज दुसऱ्या पत्नी म्हणून जगत आहेत. अशा काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊ ज्यांनी विवाहित पुरुषांवर प्रेम केलं आणि त्यानंतर लग्न…

अभिनेत्री रवीना टंडन हिचं लग्न प्रसिद्ध उद्योजक अनिल थडानी यांच्यासोबत झालं. रवीना हिच्यासोबत अनिल थडानी यांचं दुसरं लग्न आहे. अनिल थडानी यांचं पहिलं लग्न नताशा सिप्पी यांच्यासोबत झालं होतं. अनिल आणि नताशा यांना देखील दोन मुलं आहेत. रवीना हिला देखील एक मुलगी आणि एक मुलगा आहे.

अभिनेत्री हेमा मालिनी देखील अभिनेत्री धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी आहे. धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांना घटस्फोट न देता हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. आज हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाला 44 वर्ष झाली आहेत. पण अजून पर्यंत हेमा मालिनी यांनी सासर प्रवेश केलेला नाही. शिवाय, धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबाने अद्याप हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुलींचा स्वीकार केलेला नाही.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने तर मैत्रीणीच्या पतीसोबतच दुसरं लग्न केलं. शिल्पा हिने उद्योजक राज कपूर याच्यासोबत लग्न केलं आहे. शिल्पा – राय यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. राज याचं पहिलं लग्न 2003 साली कविता कुंद्रा हिच्यासोबत झालं होतं. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. 2206 मध्ये राज आणि कविता यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कविता आणि राज यांना एक मुलगी देखील आहे.

अभिनेत्री करीना कपूर हिने देखील अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत घटस्फोटानंतर लग्न केलं. लग्नाआधी सैफ आणि करीना लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहात होते. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सैफ – करीना यांनी लग्नाचा निर्णय घेतला. करीना हिची सवत अमृता सिंग एकेकाळी प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री होती.

सैफ – करीना यांना दोन मुलं आहेत. तैमूर अली खान आणि जेह अली खान अशी दोघांची नावे आहेत. सैफ – अमृता यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. सारा अली खान आणि इब्राहिम अली खान असं दोघांची नावे आहेत.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.