‘तिने चित्रपट साइन केला की तो बंद पडायचा’, बॉलिवूड अभिनेत्रीला ‘पनौती’ म्हणायचे सगळे,पण एका चित्रपटाने बदललं नशीब
अशी एक अभिनेत्री होती जिला 'पनौती' म्हटलं जाऊ लागलं होतं. कारण ती जो कोणता चित्रपट साईन करायची तो बंद पडायचा. त्यानमुळे तिच्यासोबत कोणीही चित्रपट करण्यास तयार होत नव्हते. पण एका चित्रपटाने तिचे नशीब पालटले.

चित्रपटसृष्टीतील कलाकारांना त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात बऱ्याचदा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. फार कमी स्टार्स असतात जे त्यांच्या पहिल्या चित्रपटाने प्रसिद्ध होतात. बहुतेक स्टार्सना त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात. बऱ्याचदा, कलाकारांना फ्लॉप म्हणून टॅग्ज दिले जातात. अशीच एक अभिनेत्री आहे जिची सुरुवातीची कारकीर्द चांगली होती, परंतु त्याआधी असे काही घडले ज्यानंतर तिला ‘पनौती’ म्हटले जाऊ लागले.
कोणताही चित्रपट तिने साईन केला की तो बंद पडायचा
कारण कोणताही चित्रपट तिने साईन केला की तो बंद पडायचा आणि हे वारंवार घडत असल्याने अखेर या अभिनेत्रीला चित्रपट मिळेनासे झाले होते. ही अभिनेत्री म्हणजे शिल्पा शिरोडकर, जिने तिच्या पदार्पणापूर्वी दोन मोठे चित्रपट साइन केले होते. मात्र या अफवांनंतर तिच्याकडे असलेले दोन चित्रपट काढून घेण्यात आले होते. अलीकडेच, शिल्पा शिरोडकरने एका मुलाखतीत तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितले.
‘पनौती’ म्हणून चिडवायला लागले होते
शिल्पा शिरोडकर म्हणाली ‘9 ऑगस्ट रोजी मी फिल्मालय स्टुडिओमध्ये माझा मुहूर्त झाला. तो सर्वात मोठ्या लाँचपैकी एक होता. सावनजी ‘सौतन की बेटी’ बनवत होते आणि मी त्यात मुख्य भूमिका साकारत होते. त्यापेक्षा मोठं काही असू शकत नव्हतं. पण दोन वर्षांनंतर काहीही झाले नाही. सावन जी म्हणाले की ‘मी चित्रपट बनवत नाही. जर तुम्हाला बाहेरून काही मिळत असेल तर घ्या. बोनी कपूरच्या वडिलांनी तिला ‘जंगल’ नावाच्या त्यांच्या चित्रपटात संजय कपूरच्या विरुद्ध कास्ट करण्याचे आश्वासन दिले होते. तथापि, तो चित्रपटही कधीच बनवला गेला नाही.”
View this post on Instagram
‘मी पनौती होते, एक शाप होते’
अभिनेत्रीने सांगितले की यानंतर एका शुभचिंतकाने तिच्यासाठी मिथुन चक्रवर्तीशी बोलणं केलं. ती म्हणाली ‘दादा, या मुलीचे दोन चित्रपट थांबले आहेत आणि आता इंडस्ट्री तिला वेगवेगळ्या नावांनी हाक मारत आहे, कृपया तिला लाँच करा.’ ती म्हणाली की, ” मी पनौती होती, एक शाप होते असं वाटत होती. मी जेव्हा जेव्हा एखादा मोठा चित्रपट साइन केला तेव्हा तो बंद पडला आहे. पण जर तुम्हाला कुटुंबाचा भक्कम पाठिंबा असेल तर या गोष्टी काही फरक पडत नाहीत”
या चित्रपटानंतर मात्र टॅग पुसला गेला
अखेर शिल्पा शिरोडकरने 1989 मध्ये ‘भ्रष्टाचार’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिच्यासोबत मिथुन चक्रवर्ती आणि रेखा यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटात शिल्पाने एका अंध मुलीची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने ‘किशन कन्हैया’, ‘त्रिनेत्र’, ‘हम’, ‘खुदा गवाह’, ‘आँखें’, ‘पहचान’, ‘गोपी किशन’ आणि ‘बेवफा सनम’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर मात्र तिच्यावरील ‘पनौती’ हा टॅग पुसला गेला. शिल्पा त्यानंतर शेवटची टेलिव्हिजन रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 18’ मध्ये दिसली होती.
