AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर 2’मधील आर. माधवनच्या ‘त्या’ सीनमुळे मोठा वाद; शिवसेना नेत्याकडून आंदोलन भडकण्याचा इशारा

'धुरंधर : द रिव्हेंज'मधील आर. माधवनच्या एका दृश्यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. हे दृश्य चित्रपटातून काढून टाकण्यात यावं आणि त्याबद्दल निर्मात्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी शिवसेना नेत्यांनी केली आहे.

'धुरंधर 2'मधील आर. माधवनच्या 'त्या' सीनमुळे मोठा वाद; शिवसेना नेत्याकडून आंदोलन भडकण्याचा इशारा
आर. माधवनImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 24, 2026 | 11:37 AM
Share

‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाचा नवा वाद समोर आला आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाच्या एका सीनमध्ये गुरबानीचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना नेते गुरजोत सिंह कीर यांनी या दृश्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी याप्रकरणी सार्वजनिक माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. हा वाद त्या दृश्यावरून होत आहे, ज्यामध्ये अभिनेता आर. माधवनने साकारलेला अजय सन्याल हा गुरबानीचा उल्लेख करतो. गुरबानीचा उच्चार करताना त्याच्या हातात सिगारेट दाखवण्यात आली आहे. असं दाखवणं धार्मिक मर्यादेविरुद्ध असल्याचा आरोप शीख समुदायाने आणि नेत्यांनी केला आहे. यामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्याचं म्हटलं आहे.

शिवसेना नेते गुरजोत सिंह कीर यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत ‘धुरंधर 2’मधील हे दृश्य भावना दुखावणारा आणि अस्वीकार्य असल्याचं म्हटलं आहे. “गुरबानी हा शीख धर्मियांचा पवित्र ग्रंथ आहे आणि त्याचं अशाप्रकारे चित्रण करणं कोणत्याही परिस्थितीत समर्थन करण्यासारखं नाही. मी चित्रपट निर्मात्यांना तात्काळ माफी मागण्याची आणि ते वादग्रस्त दृश्य काढून टाकण्याची मागणी करतो”, असं ते पुढे म्हणाले. इतकंच नव्हे तर तात्काळ कारवाई न केल्यास या मुद्द्यावरून आंदोलनं भडकू शकतात, असाही इशारा त्यांनी दिला आहे. “धार्मिक भावनांशी संबंधित बाबींमध्ये, विशेषत: जेव्हा एखाद्या समाजाच्या श्रद्धेचा प्रश्न येतो, तेव्हा संवेदनशील राहणं महत्त्वाचं आहे”, असंही गुरजोत यांनी नमूद केलं.

मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी एक तक्रारसुद्धा दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीत चित्रपटाशी संबंधित व्यक्तींवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप दिग्दर्शक आदित्य धर किंवा अभिनेता आर. माधवनने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

‘धुरंधर : द रिव्हेज’ हा चित्रपट 19 मार्च रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला असून गेल्या पाच दिवसांत रणवीर सिंहच्या या चित्रपटाने कमाईचा 500 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. यामध्ये रणवीरसोबतच आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, राकेश बेदी, सारा अर्जुन यांच्याही भूमिका आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...