‘मासोळी ठुमकेवाली’ नवं कोळीगीत चाहत्यांच्या भेटीस, गाणं ऐकून तुम्हीही धराल ताल

Masoli Thumkewali : कोळीगीतांची चाहत्यांमध्ये असते क्रेझ... आणखी एक कोळीगीत 'मासोळी ठुमकेवाली' गाणं ऐकून तुम्हीही धराल ताल... सध्या सर्वत्र 'मासोळी ठुमकेवाली' गाण्याची चर्चा, गाण्याचा व्हिडीओ सर्वत्र तुफान व्हायरल

'मासोळी ठुमकेवाली' नवं कोळीगीत चाहत्यांच्या भेटीस, गाणं ऐकून तुम्हीही धराल ताल
Follow us
| Updated on: Nov 04, 2023 | 1:01 PM

मुंबई | 4 नोव्हेंबर 2023 : कोणताही मराठी सण कोळीगीतांशिवाय पूर्ण होत आहे. अनेक गाणी चाहत्यांच्या भेटीस येतात पण कोळीगीतांची बातच काही और असते… लग्नकार्यात कोळीगीत असायलाच हवेत… त्याशिवाय हळदीचा कार्यक्रम पूर्ण होत नाही… आता देखील एक नवं कोळीगीत चाहत्यांच्या भेटीस आलं आहे आणि त्या गाण्याचं नाव आहे ‘मासोळी ठुमकेवाली..’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘मासोळी ठुमकेवाली’ गाण्याची चर्चा आहे. युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलेलं ‘मासोळी ठुमकेवाली’ गाणं अनेकांना आवडलं आहे.

अभिनेत्री शिवाली परब आणि अभिजित अमकर यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं गाणं चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. गाण्यातील शिवाली आणि अभिजित यांची केमिस्ट्री देखील चाहत्यांना प्रचंड आवडली आहे. गाणं ऐकल्यानंतर आणि शिवाली आणि अभिजित यांचा डान्स पाहिल्यानंतर तुम्ही देखील नक्कीच ताल धराल..

पाहा ‘मासोळी ठुमकेवाली..’ कोळीगीत

हे सुद्धा वाचा

शिवाली आणि अभिजित यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं ‘मासोळी ठुमकेवाली’ गाणं तुम्हाला सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे. व्हिडीओचं दिग्दर्शन आणि नृत्य दिग्दर्शन कृतिक माझिरे याने केलं आहे. हर्ष करण आदित्य यांच्या शब्दांनाहर्षवर्धन वावरे, करण वावरे, आदित्य पाटेकर यांनी संगीतबद्ध केलं आहे. कस्तुरी वावरे, आदित्य पाटेकर यांनी हे गाणं गायलं आहे.

सध्या सर्वत्र ‘मासोळी ठुमकेवाली’ गाण्याची चर्चा रंगली आहे. चाहते देखील कायम नवीन कोळीगीतांच्या प्रतीक्षेत असतात. आतापर्यंत अनेक कोळीगीती प्रदर्शित झाली आणि चाहत्यांच्या पसंतील उतरली. आता ‘मासोळी ठुमकेवाली’ गाणं देखील चाहत्यांना आवडत आहे. चाहते देखील कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आहेत.

‘मासोळी ठुमकेवाली’ शिवाली हिच्या अदा चाहत्यांच्या प्रचंड आवडल्या आहेत. तर अभिजित याच्या डान्सचं देखील कौतुक होत आहे. गाण्यातील दोघांच्या केमिस्ट्रीमुळे शिवाली आणि अभिजित यांच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली असल्याचं दिसून येत आहे. कारण व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे आहे.

महत्त्वाचं म्हणजे आता लग्न  सराई देखील लवकरच सुरु होणार आहे. याच मुहुर्तावर ‘मासोळी ठुमकेवाली’ गाणं प्रदर्शित झाल्यामुळे अनेकांच्या हळदी कार्यक्रमात गाणं वाजेल यात काही शंका नाही. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘मासोळी ठुमकेवाली’ गाण्याची चर्चा रंगलेली आहे.

Non Stop LIVE Update
दादांचे पुत्र पार्थ पवार म्हणाले, 'मी शरद पवार यांना भेटायला जाणार...'
दादांचे पुत्र पार्थ पवार म्हणाले, 'मी शरद पवार यांना भेटायला जाणार...'.
नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात 10 सभा, कुठे-कधी असणार पंतप्रधान?
नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात 10 सभा, कुठे-कधी असणार पंतप्रधान?.
राष्ट्रवादीत फूट, पहिल्यांदाच दोन पाडवा; सुप्रिया सुळे म्हणाल्या...
राष्ट्रवादीत फूट, पहिल्यांदाच दोन पाडवा; सुप्रिया सुळे म्हणाल्या....
'बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं', मुख्यमंत्र्यांचा कोणावर संताप?
'बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं', मुख्यमंत्र्यांचा कोणावर संताप?.
'लाडक्या बहिणी'साठी आनंदाची बातमी, शिंदेंकडून योजनेसंदर्भात मोठी अपडेट
'लाडक्या बहिणी'साठी आनंदाची बातमी, शिंदेंकडून योजनेसंदर्भात मोठी अपडेट.
MNS deepotsav : दादार शिवाजी पार्कातील मनसेचे कंदील हटवले, कारण काय?
MNS deepotsav : दादार शिवाजी पार्कातील मनसेचे कंदील हटवले, कारण काय?.
गोविंदबागेत शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी कार्यकर्त्यांची रिघ
गोविंदबागेत शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी कार्यकर्त्यांची रिघ.
दादांना भेटण्यासाठी काटेवाडीत समर्थकांची गर्दी, दोन दिवाळी पाडवे अन्..
दादांना भेटण्यासाठी काटेवाडीत समर्थकांची गर्दी, दोन दिवाळी पाडवे अन्...
'बच्चू कडू लाचार...', रवी राणांचा पलटवार, पुन्हा एकदा जुंपली
'बच्चू कडू लाचार...', रवी राणांचा पलटवार, पुन्हा एकदा जुंपली.
'स्टॅम्पपेपरवर लिहून देतो..', अमित ठाकरेंविरोधात सदा सरवणकर ठाम
'स्टॅम्पपेपरवर लिहून देतो..', अमित ठाकरेंविरोधात सदा सरवणकर ठाम.