Thalaivi : ‘थलायवी’चं शूटिंग पूर्ण, जयललीता यांचा फोटो शेअर करत कंगनाचं भावनिक ट्विट

कंगनानं तिचा आगामी चित्रपट 'थलायवी'चं (Thalaivi) शूटिंग पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे.(Shooting of 'Thalaivi' completed, Kangana Ranaut's emotional tweet)

  • Updated On - 3:19 pm, Sun, 13 December 20
Thalaivi : 'थलायवी'चं शूटिंग पूर्ण, जयललीता यांचा फोटो शेअर करत कंगनाचं भावनिक ट्विट

मुंबई : कोरोनामुळे चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे. लॉकडाऊनमुळे अनेक प्रोजेक्ट ठप्प झाले होते. आता अनलॉकमध्ये शूटिंग परत सुरू करण्यात आलं आहे. गेला काही काळ अभिनेत्री कंगना रनौतसुद्धा शूटिंगमध्ये व्यस्त होती (Kangana Ranaut). आता शनिवारी कंगनानं तिचा आगामी चित्रपट ‘थलायवी’चं (Thalaivi) शूटिंग पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे. हा चित्रपट अभिनेत्री-राजकारणी दिवंगत जयललिता (J. Jayalalithaa) यांच्या जीवनावर आधारित आहे.

कंगनानं ट्विटरद्वारे ‘थलायवी’चं चित्रीकरण पूर्ण झाल्याची बातमी चाहत्यांना दिली आहे. ‘..आणि चित्रपट पूर्ण झाला. आज आम्ही आमचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प ‘थलायवी’चं शूटिंग यशस्वीरित्या पूर्ण केलं आहे.’ असं ट्विट करत तिनं चित्रपटाच्या संपूर्ण क्रूचे आभार मानले आहेत.

‘थलायवी’ व्यतिरिक्त कंगना रनौत सर्वेश मेवाडा दिग्दर्शित ‘तेजस’ या चित्रपटातही झळकणार आहे. या चित्रपटात ती एअर फोर्स अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगना या महिन्यातच चित्रपटाचं शूटिंगला सुरुवात करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.याशिवाय कंगना ‘धाकड’ नावाच्या अ‍ॅक्शन ड्रामा फिल्ममध्येही दिसणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर्स फार पूर्वी आलं होतं, ज्यात कंगना चांगलीच अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसली.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना फक्त तिच्या चित्रपटांसाठी नाही तर तिच्या वक्तव्यांमुळेसुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चेत असते. कधी शेतकऱ्यांचा मुद्दा तर कधी लव्ह जिहाद. यासारख्या अनेक प्रकरणांवर तीनं टिप्पणी केली होती.त्यानंतर तिला नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं होतं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI