Shruti Marathe : आमटी साठी straw वापरा.. ग्लोव्हज घालून जेवणाऱ्या श्रुती मराठेला मजेशीर सल्ला, तिने असं का केलं ?
तसं पहायला गेलं तर हा व्हिडीओ तसा साधाच आहे, टेबलवर जेवणाचं ताट ठेवून, खुर्चीत बसून श्रुती शांतपणे जेवत्ये, पण नीट पाहिलं तर त्यातील गंमत कळेल. तो पाहिल्यावर तुमच्याही चेहऱ्यावर हसू फुलेल. नेटकऱ्यांनी यावर विविध मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

मोठा पडदा असो की छोटा पडदा म्हणजे टीव्ही, तिथे झळकणाऱ्या आपल्या आवडत्या कलाकारांच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यास चाहते, सर्वसामान्य लोक नेहमी उत्सुक असतात. आजकाल बरेच कलाकार सोशल मीडियावर सक्रीय असतात, त्यांच्या आयुष्यातील अनेक चांगल्या, वाईट, मजेशीर घटनाही ते पोस्ट करत असतात, चाहत्यांना अपडेट्स देत असतात.सोशल मीडियाच्या माधम्यमातून आजकाल सगळं समजतं. अगदी जगाच्या त्या कोपऱ्यात घडत असलेल्या गोष्टीही क्षणात इथपर्यंत पोहोचू शकतात, अतिशय ताकदीचे माध्यम आहे हे. त्यामुळे कलाकाराही त्यांचे अपडेट्स, आगामी प्रोजेक्ट्स, फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. ज्यावर लगेच लोकांच्या लाईक्स, कमेंट्स येतात, त्यातून त्यांच्या प्रतिक्रिया कळतात, कधी ते कौतुक करतात, तर काही आवडलं नाही तर नाराजी सप्ष्टपणे सांगून एखाद्याला ट्रोलही करतात.
मराठी मनोरंजनसृष्टीतला एक सुंदर, गोड आणि नावाजलेला चेहरा म्हणजे अभिनेत्री श्रुती मराठे. राधा ही बावरी या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली श्रुती ही सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असते. ती आणि तिचा पती गौरव घाटणेकर दोघेही याच क्षेत्रात असून त्यांची जोडी खूप लोकप्रिय आहे. ते एकमेकांवरील प्रेम खुलेपणाने व्यक्त करतात, एकमेकांच्या अपडेट्स, फोटो शेअरिंगही सुरूच असतं. याचदरम्यान आता गौरव घाटणेकर यांनी नुकताच श्रुतीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती जेवताना दिसत्ये.
ग्लोव्ह्ज घालून जेवत होती श्रुती
आता हे वाचून तुम्ही म्हणाला जेवणाचा व्हिडीओ टाकला तर त्यात एवंढ काय, पण हा व्हिडीओ तुम्ही नीट पाहिलात तर तुमच्याही तोंडाचा आ वासेल आणि त्या खालच्या कमेंट्स वाचल्या तरू हसून हसून पुरेवाट होईल. तसं पहायला गेलं तर हा व्हिडीओ तसा साधाच आहे, टेबलवर जेवणाचं ताट ठेवून, खुर्चीत बसून श्रुती शांतपणे जेवत्ये, पण नीट पाहिलं तर त्यातील गंमत कळेल. श्रुती चक्क ग्लोव्हज घालून जेवत होती. आणि तोच क्षण कॅप्चर करत, त्यावर मजेशीर काँमेंट्र्ही गौरवने केली आहे. तो म्हणतो, “‘हे बघा, श्रृती ताई आज ग्लव्स घालून जेवत आहेत. कारण आज त्या नेल जॉब करून आल्यात. मग आज घरी जेवायला होती भेंडीची भाजी आणि भाकरी. तर ग्लव्स घालूनच तिने हात धुतला आणि जेवायला बसली. कारण जर त्याला हळद लागली तर आज तिने जो केलेला नेल जॉब होता तो खराब झाला असता म्हणून.” असं अगदी संदर्भासहीत स्पष्टीकरणही त्याने या व्हिडीओसोबत दिलं आहे.
इथे पहा व्हिडीओ
View this post on Instagram
मॅडम आमटी साठी straw वापरा… नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरलेलं नाही. त्यावर हजारे लाईक्स आणि भन्नाट कमेंट्स आल्या असून अनेकांनी श्रुतीची मस्त मजा घेतली आहे. पण यावर खिलाडूवृ्ती दाखवत खुद्द श्रुतीनेही एक मजेशीर कमेंट केली. मला 2 प्रश्न विचारायचे आहेत, श्रुती ताई म्हणजे का? आणि दुसरा प्रश्न असा की हे नेल जॉब काय असतं ? असे मजेशीर प्रश्न तिने पती गौरवलाच विचारले आहेत.
हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनीही एकसे एक कमेंट्स केल्या आहेत. “मॅडम आमटी साठी straw वापरा” असा मजेशीर सल्लाचे एकाने तिला दिला. तर “रबरी भेंडी जबरी भेंडी” अशी खोडकर कमेंटही दुसऱ्या युजरने केली. “कलियुगात अजून काय काय बघायला मिळेल?😂” असा सवाल विचारत एकाने हसणारी इमोजीही टाकली आहे. “श्रुती मँडम…चमचा पण घ्या हातात आणी जेवा…म्हणजे हाताला हॅन्ड क्लोज घातले ते पण खराब होणार नाही…आणी एक आमटी साठी स्ट्रा वापरा…👏👏”असंही एकाने खोचकपणे साांगितलं.”ताईंचा नाद करायचा नाय!” असं एकाने सांगितलं. पण सगळ्यात भारी कमेंट तर एकाने केली ती म्हणजे, “सचिन पिळगांवकरचि बहीण 😂” असं म्हणत त्याने हसत चिमटा काढला. ” त्यापेक्षाा नवऱ्याला भरवायला सांगायचं ना ” असा फुकटचा सल्लाही एका युजरने दिला. एकंदरच हे मजेशीर रील सर्वांनाच आवडलं असून तुम्ही पाहिलंत तर तुम्हालाही हसू फुटेल.
