AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन प्रसिद्ध गायकांच्या कारला भीषण अपघात; कार्यक्रम आटपून घरी जात होते अन्..

तीन प्रसिद्ध गायकांच्या कारचा भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र तिघांनाही दुखापत झाली आहे. त्यापैकी एकीवर शस्त्रक्रिया झाली असून दुसऱ्या गायिकेवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

तीन प्रसिद्ध गायकांच्या कारला भीषण अपघात; कार्यक्रम आटपून घरी जात होते अन्..
गणेश शिंदे, सन्मिता शिंदेImage Credit source: Instagram
| Updated on: May 24, 2026 | 12:15 PM
Share

‘मोगरा फुलला’ हा कार्यक्रम आटपून घरी परतत असताना प्रसिद्ध गायक गणेश शिंदे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. क्षणार्धात एअरबॅग्स उघडल्याने मोठा अनर्थ टळला आणि गाडीत असलेल्या तिघांचे प्राण वाचले. त्यापैकी एअरबॅगमुळे गणेश शिंदे यांच्या छातीला दुखापत झाली असून गायिका सन्मिता शिंदे आणि गायिका प्रतिक्षा या दोघींच्या पायाला दुखापत झाली. या अपघाताबद्दलची माहिती खुद्द गणेश यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

नेमकं काय घडलं?

घडलेल्या घटनेबद्दल गणेश शिंदे यांनी इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिलं, ‘कानावरून गेलं.. ‘मोगरा फुलला’ हा कार्यक्रम आटपून घरी परतत असताना आमच्या गाडीला भीषण अपघात झाला. क्षणार्धात एअरबॅग्स ओपन झाल्याने मोठा अनर्थ टळला. मला एअरबॅग्समुळे छातीला दुखापत झाली असली तरी ती ऑपरेशनशिवाय बरी होण्यासारखी आहे. सन्मिता आणि गायिका प्रतिक्षा यांच्या पायाला दुखापत झाली. मित्रपरिवार, ॲम्ब्युलन्स सेवा आणि माऊली हॉस्पिटल तसंच संचेती हॉस्पिटल इथल्या डॉक्टरांनी तातडीने मदत केल्यामुळे सर्व उपचार वेळेत सुरू झाले. प्रतिक्षाचं ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं असून सन्मिताचंही ऑपरेशन आता व्यवस्थित पार पडेल. ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना तिला ज्ञानोबरायांचा फोटो दाखवला मोबाईलमध्ये म्हटलं, तू आता बरी होशील आणि माऊलीसमोर अभंग म्हणशील.. इवलेसे रोप लावियेले द्वारी..’

‘या संपूर्ण प्रसंगात अनेक प्रश्न मनात येतात, पण शेवटी जाणवतं की अनेक गोष्टी आपल्या हातात नसतात. पुढे अधिक काळजी घ्यायची आणि बाकी सर्व माऊलींच्या चरणी स्वाधीन करायचं. आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे, मित्रपरिवाराचे, शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेतच. अनेक मित्रांनी मान्यवरांनी मनापासून सहकार्य केलं आणि तातडीने मदत उपलब्ध झाली आभारी आहोत. ज्ञानोबारायांची कृपा आणि आपला आशीर्वाद कायम सोबत राहो,’ अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

या पोस्टच्या शेवटी त्यांनी तुकोबारायांचे काही शब्द लिहिले आहेत. “कृपाळू सज्जन, तुम्ही संतजन, परी पायावेगळा करू नका..”, असं त्यांनी लिहिलं आहे. गणेश शिंदे यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल