AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Poonam Pandey : मला वाटतंय ती जिवंत आहे… पूनम पांडेच्या निधनाच्या बातमीवर प्रसिद्ध गायकाचा विश्वासच बसेना

Poonam Pandey Death: पूनम पांडेच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. अभिनेत्रीचा असा मृत्यू झाला यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. अनेकांना तिच्या जाण्याची बातमी फेक वाटत आहे. त्यातच आता एक प्रसिद्ध गायकाची प्रतिक्रियाही समोर आली आहे.

Poonam Pandey : मला वाटतंय ती जिवंत आहे... पूनम पांडेच्या निधनाच्या बातमीवर प्रसिद्ध गायकाचा विश्वासच बसेना
| Updated on: Feb 03, 2024 | 7:55 AM
Share

मुंबई | 3 फेब्रुवारी 2024 : प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे हिच्या निधनाच्या वृत्ताने शुक्रवारी सर्वत्र खळबळ माजली. अवघ्या 32 वर्षांच्या पूनमचं सर्व्हिकल कॅन्सरने निधन झाल्याची बातमी तिच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या टीमने शेअर केली. मात्र ही बातमी समोर येताच मनोरंजन क्षेत्रातील लोकांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला. अनेकांचा तर या बातमीवर विश्वासच बसेना.. तिचा मृत्यू नक्की कधी, कुठे झाला ? तिच्या कॅन्सरबाबत ती कोणाशीच बोलली नव्हती, काही दिवसांपूर्वीच्या तिच्या व्हिडीओमध्ये तर पूनम ठणठणीत दिसत होती. असं म्हणत अनेकांनी तिच्या मृत्यूच्या बातमीबाबत साशंकता व्यक्त केली आहे. अनेक सेलिब्रिटींना देखील ही न्यूज फेक अर्थात खोटी वाटत आहे. त्या लिस्टमध्ये प्रसिद्ध गायक राहुल वैद्य याचे नावही जोडलं गेलं आहे.

काय होती राहुल वैद्यची प्रतिक्रिया ?

राहुल वैद्यने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं आहे की, ‘पूनम पांडे गेली नाही ( मृत्यू झाला नाही) असं वाटणारी मी एकमेव व्यक्ती आहे का ?’ या पोस्टमुळे गायक राहुललाही पूनमचे ​​निधन झाले यावर विश्वास बसत नसल्याचे दिसते. इतर लोकांप्रमाणे राहुल देखील ही बातमी स्वीकारू शकत नाहीये असं दिसतंय.

विनीत कक्कडलाही वाटत्ये बातमी फेक

केवळ राहुल वैद्यच नव्हे तर पूनमचा मित्र आणि माजी लॉकअप स्पर्धक विनीत कक्करनेही ही बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे. त्याने एक निवेदन जारी केले आहे की – “मला वाटतं की ही बातमी खोटी आहे. मी पूनमला ओळखतो, ती एक मजबूत मुलगी आहे. मी तिच्यासोबत लॉकअप शोमध्ये दोन आठवडे घालवले आहेत. मला तिचे व्यक्तिमत्त्व माहित आहे. ती खूप मजबूत मुलगी आहे.” असे म्हणत विनीतने तिच्या मृत्यूची बातमी खरी नसल्याचं म्हटलं आहे.

पूनम पांडेचं खरोखर निधन झालंय का असा प्रश्न अनेक सेलिब्रिटींना पडला. अभिनेत्री रोजलिन खान हिनेही त्यावर संशय व्यक्त केला होता. मला माहिती नाही की, पूनमबद्दल जी बातमी आलीये ती खरी आहे की, खोटी. जर हे खोटे असेल तर स्टंट करण्यासाठी गर्भाशयातील कॅन्सरला उपयोग केला जातोय, असं तिने नमूद केलं.

या सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली

एकीकडे काही लोकांना पूनमबद्दलच्या बातम्या फेक वाटत आहे. पण दुसरीकडे पूनमच्या मृत्यूबद्दल अनेक सेलिब्रिटींनी दु:ख व्यक्त केले. लॉकअप शोची होस्ट अभिनेत्री कंगना रनौतने पूनमच्या आकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पूनमचे ​​इतक्या लहान वयात झालेले निधन धक्कादायक आहे, असे तिने पोस्टमध्ये लिहिले आहे. तसेच अभिनेत्री पूजा भट्टनेही पोस्ट करून अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिली.

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.