AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्मिता पाटील यांच्या मुलाने तोडले सर्व संबंध? रक्षाबंधनला बहिणीची भावूक पोस्ट, म्हणाली.. रक्ताची नाती..

शनिवारी देशभरात एकदम उत्साहाने रक्षाबंधन साजरं करण्यात आलं. सामान्य नागरिकांपासून ते विविध सेलिब्रिटी, सर्वांनी आपल्या भावा-बहिणींसह हा सण प्रेमाने साजरा केला, अनेकांनी तर फोटोही शेअर केले. पण बॉलिवूडमधील चर्चित अभिनेत प्रतीक बब्बर हा मात्र त्याच्या सावत्र बहिणीकडून राखी बांधून घेण्यासाठी गेला नाही. त्यानंतर जुही बब्बरने सोशल मीडियावर इमोशनल पोस्ट शेअर केली असून ती नेटवर वेगाने व्हायरल होत्ये.

स्मिता पाटील यांच्या मुलाने तोडले सर्व संबंध? रक्षाबंधनला बहिणीची भावूक पोस्ट, म्हणाली.. रक्ताची नाती..
जुही बब्बरची इमोशनल पोस्टImage Credit source: social media
| Updated on: Aug 11, 2025 | 10:18 AM
Share

राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा भाऊ-बहिणींमधील प्रेमाचा, ते साजरं करण्याचा सण आहे. या दिवशी भावा-बहिणींमध्ये काही कटुता असली तरी ती विसरली जाते. जुन्या आठवणींना उजाळा दिला जातो. पण बब्बर कुटुंबात सर्व काही ठीक नसल्याचे दिसते. विख्यात ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर यांची मुलगी जुही बब्बर सोनी हिने रक्षाबंधनच्या दिवशी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिचा सावत्र भाऊ प्रतीक बब्बर कुठेही दिसत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत होतं.

जुही बब्बर सोनीने इन्स्टाग्रामवर रक्षाबंधनाच्या सेलिब्रेशनचा एक फोटो शेअर केला. हसरे फोटो तर होते, मात्र त्यासोबत शेअर करण्यात आलेली तिची कॅप्शन अतिशय इमोशनल होती, त्यामध्ये तिने तिच्या आतल्या (मनातील) रिकामेपणाचा उल्लेख केला. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिने बरेच फोटो शेअर केले, परंतु त्यामध्ये तिचा सावत्र भाऊ, प्रतीक स्मिता पाटील कुठेच दिसला नाही. प्रतीक काही महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अ़कला, तेव्हा त्याने त्याच्या वडिलांना आणि बब्बर कुटुंबातील कोणालाही लग्नाला आमंत्रित केले नव्हते, आणि आता तो राखीच्या या उत्सवातही त्यांच्यासोबत सामील झाला नाही.

जुही बब्बरची पोस्ट काय ?

जुहीने आर्य बब्बरला राखी बांधनतानाचे तसेच रक्षाबंधनचे इतर काही फोटो टाकत एक कॅप्शनही लिहीली. – ‘ काही सेलिब्रेशन पूर्ण असतात.. तर काही अधुरी वाटतात. आज रक्षाबंधन आहे, आणि मनात आनंद तर आहे, पण माझ्या हृदयाचा एक भाग अजूनही गायब आहे. पण आयुष्य पुढे जातच असतं.. आणि रक्ताची नाती कोणी बदलू शकत नाही. खरं रक्त कायम (सोबत) राहतं’ असं तिने पोस्टसोबत लिहीलं.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

तिच्या या पोस्टवर अनेक चाहत्याचे लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. पण या सेलिब्रेशनमध्ये प्रतीकचं नसणं अनेकांना खटकलं. एका यूजरने लिहीलं, ‘मी तुमच्या कौटुंबिक बाबींवर भाष्य करणं योग्य नाही नाही, पण प्रतीक न दिसल्याने मला खूप वाईट वाटलं. त्यानेही यायला हवं होतं.’ तर दुसऱ्या चाहत्याने थेट प्रश्न विचारला, ‘प्रतीक आता भाऊ नाही का? तो या फोटोंमध्ये का नाहीये?’ ‘तुम्ही प्रतीक भैयाला आमंत्रित केले नाही का?’असंही आणखी एकाने कमेंट करत विचारलं.

एप्रिलपासून प्रतीकची दूरी

प्रतीक हा राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा आहे. स्मितापूर्वी राज यांचे लग्न नादिरा बब्बरशी झाले होते, त्यांच्यापासून त्यांना जुही आणि आर्या ही दोन मुले आहेत. पूर्वी प्रतीक त्याच्या सावत्र भावंडांसह एकत्र राहत होता, परंतु एप्रिल 2025 पासून ते वेगळे झाले आहेत. त्यानंतर जुहीने एक फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘राज बब्बरजींची तीन मुले… जुही, आर्या आणि प्रतीक. हे सत्य कोणीही बदलू शकत नाही.’

आता राखीच्या सेलिब्रेशनलाही प्रतीक न आल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.