बहिणीसाठी काहीपण… स्मृती मानधनाच्या मोठ्या भावाने तिच्यासाठी जे केलं, त्यासाठी होतंय कौतुक
सिधुदुर्गात भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांनी निलेश राणेंवर निशाणा साधला आहे. निलेश राणे निवडणूक आयोगाला खोटं ठरवत आहेत असा आरोप शिल्पा यांच्याकडून करण्यात आला आहे. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा लग्नसोहळा पुढे ढकलल्यावरून चर्चा होत असताना त्यातच आता स्मृतीच्या भावाची चर्चा होऊ लगाली आहे.

भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना हिने तिच्या उत्कृष्ट कामगिरीने अनेक विक्रम मोडले आहेत आणि पुरस्कार जिंकले आहेत. स्मृती मानधना ही भारतीय महिला क्रिकेट संघाची एक स्टार खेळाडू आहे. स्मृती ही भारतीय संघाची उपकर्णधार आहे. महिला संघातील इतर खेळाडू तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिला विराट कोहली म्हणतात.
स्मृतीच्या भावाची जोरदार चर्चा होताना दिसते
संघाची उपकर्णधार आहे. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा लग्नसोहळा पार पडणार होता. हळद, संगीत सगळे कार्यक्रम थाटामाटात पार पडले. लग्नाच्याच दिवशी स्मृती यांच्या यांची तब्येत बिघडली होती. स्मृतीच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर आता त्यांना डिस्चार्ज. पण या सगळ्या दरम्यान स्मृतीच्या भावाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. त्याने तिच्यासाठी जे केलं ते खरोखरंच कौतुकास्पद आहे.
श्रवण स्मृतीचा हा मोठा भाऊ अन् उत्तम क्रिकेटर
स्मृतीच्या भावाचे नाव श्रवण मानधना आहे. तो देखील उत्तम क्रिकेटर आहे.स्मृती मानधनाचा हा मोठा भाऊ आहे. ज्याचे आपल्या बहिणीवर प्रचंड प्रेम आहे. त्यांने कायमच तिला साथ दिली आहे. तो आता 33 वर्षांचा आहे. श्रवणही आधी क्रिकेट खेळायचा. श्रवणमुळे स्मृतीलाही क्रिकेटची आवड लागली. त्याच्यामुळे स्मृतीलाही क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाली. तिच्या भावानेही याच तिची साथ दिली. ती देखील भावाप्रमाणेच डावखुरी फलंदाज आहे.
View this post on Instagram
हे फक्त श्रवणमुळे शक्य झाल्याचं स्मृती म्हणते
तिने क्रिकेटसाठीचे स्वप्न पाहण्यापासून ते मैदानात उतरून भारतासाठी खेळण्यापर्यंत सर्व काही श्रवणमुळे शक्य झाल्याचं स्मृतीने नेहमीच म्हटलं आहे. ती आज एक उत्तम क्रिकेटर आहे यासाठी ती तिच्या वडिलांना आणि तिच्या भावाला श्रेय देते. कारण स्मृतीचा भाऊ श्रवणने स्वतःपेक्षा तिच्या कारकिर्दीवर जास्त लक्ष केंद्रित केलं.
जेव्हा श्रवणचे क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही…
एवढंच नाही तर त्याने स्मृतीला तिच्या भावाने प्रशिक्षणही दिलं आहे. जेव्हा श्रवणचे क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही, तेव्हा त्याने आनंदाने सांगलीतील एका खाजगी बँकेत शाखा व्यवस्थापकाच्या पदासाठीचे काम स्विकारले. तो स्मृतीच्या नावावर असलेले एसएम-18 कॅफे देखील चालवतो. तसेच तो क्रिकेट कोचिंग अकादमी देखील चालवतो. क्रिकेट त्याच्या आयुष्यात खोलवर रुजलं आहे. श्रवणचे 10 जुलै 2018 रोजी लग्न झाले असून त्याला हृणय मानधना नावाचा मुलगाही आहे.
