AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तोच चेहरा, तेच डोळे, तेच हास्य… हुबेहूब ऐश्वर्या रायसारख्या दिसणाऱ्या तरुणीला पाहून म्हणाल…

Aishwarya Rai | 'ही' तरुणी म्हणजे तारुण्यातील ऐश्वर्या राय, तोच चेहरा, तेच डोळे, तेच हास्य... हुबेहूब ऐश्वर्यासारख्या दिसणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून व्हाल थक्क... सोशल मीडियावर तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल... नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव...

तोच चेहरा, तेच डोळे, तेच हास्य... हुबेहूब ऐश्वर्या रायसारख्या दिसणाऱ्या तरुणीला पाहून म्हणाल...
ऐश्वर्या राय
| Updated on: Jun 05, 2024 | 2:19 PM
Share

अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला आज कोणी ओळखत नाही… असं कोणीच नसेल. गेल्या अनेक वर्षांपासून ऐश्वर्या बॉलिवूडपासून दूर आहे. पण तिच्याबद्दल कोणत्या न कोणत्या चर्चा रंगलेल्या असतात. सोशल मीडियावर देखील ऐश्वर्या हिने अनेक फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. वयाच्या 50 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. ऐश्वर्या हिची स्टाईल फॉलो करण्याचा प्रयत्न अनेक मुली करत असतात. ऐश्वर्या सारखं बोलणं, तिच्यासारखं हसणं, तिच्यासारखे हावभाव… करण्याच्या प्रयत्नात अनेक तरुणी असतात.

आता देखील अशाच एका तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या ज्या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ती तरुणी हुबेहूब ऐश्वर्या राय हिच्यासारखी दिसत आहे. हुबेहूब ऐश्वर्या हिच्यासारख्या दिसणाऱ्या तरुणीचं नाव आशिता सिंग असं आहे.

आशिता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. रोज आशिता सोशल मीडियावर काही न काही पोस्ट करत असते. आशिता बॉलिवूड गाण्यांवर रिल्स देखील बनवत असते. तिच्या फोटो आणि व्हिडीओंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत असतो. आशिता हिच्या इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सची संख्या देखील फार मोठी आहे. आशिता हिचं स्वतःचं युट्यूब चॅनल देखील आहे.

नेटकरी कायम आशिता हिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. आशिता हिच्या व्हिडीओवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘ही हुबेहूब ऐश्वर्यासारखी दिसते.’ दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, ‘सो स्वीट…’ सोशल मीडियावर आशिता हिचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात.

ऐश्वर्या हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री ‘पोन्नियन सेल्वन 2 ‘ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आली होती. आता सध्या तरी ऐश्वर्या तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल घोषणा केलेली नाही. पण अभिनेत्रीला अनेक ठिकाणी लेक आराध्या हिच्यासोबत स्पॉट करण्यात येतं.

ऐश्वर्या तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या देखील चर्चा रंगल्या होत्या. पण यावर दोघांनी देखील अधिकृत वक्तव्य केलं नाही. ऐश्वर्या हिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना