AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aishwarya Rai: ‘आता ती सर्वांसमोर रडते आणि…’, ऐश्वर्याबद्दल सलमान खानच्या भावाचं मोठं वक्तव्य

Aishwarya Rai: ऐश्वर्या राय - सलमान खान यांच्या नात्यावर जेव्हा अभिनेत्याच्या भावाने सोडलं मौन... म्हणाला, 'आता ती सर्वांसमोर रडते आणि...', गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत...

Aishwarya Rai: 'आता ती सर्वांसमोर रडते आणि...', ऐश्वर्याबद्दल सलमान खानच्या भावाचं मोठं वक्तव्य
| Updated on: Oct 26, 2024 | 2:47 PM
Share

Aishwarya Rai: गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्या राय तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत अभिनेत्रीच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. सांगायचं झालं तर, अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करण्याआधी अनेक सेलिब्रिटींसोबत अभिनेत्रीच्या नावाची चर्चा झाली. अभिनेता सलमान खान याच्यासोबत असलेल्या नात्याच्या चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमाच्या सेटवर दोघांची ओळख झाली आणि ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर 2001 मध्ये सलमान – ऐश्वर्या यांचा ब्रेकअप झाला.

एका जुन्या मुलाखतीत ऐश्वर्या हिने सलमान खा याच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं होतं. शिवाय भाईजानवर अनेक गंभीर आरोप देखील केले होते. ‘सलमान खान याच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे अनेक अडचणींचा सामना केला आहे. शाब्दिक, शारीरिक आणि भावनिक अत्याचार, फसवणूक आणि अपमानाचा सामना करावा लागला.’ असं गंभीर आरोप ऐश्वर्याने केले.

ऐश्वर्याने केलेल्या गंभीर आरोपांवर सलमान खान याने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. पण अभिनेता सोहैल खान याने सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं होतं. ऐश्वर्या राय हिने सलमान खान याच्याबद्दल वाईट वक्तव्य केल्यामुळे सोहैल खान याने अभिनेत्रीवर निशाणा साधला होता.

‘ऐश्वर्या कायम आमच्या घरी यायची. कुटुंबियांसोबत तिचे चांगले संबंध होते. पण तिने कधीच सलमान सोबत असलेल्या नात्याचा स्वीकार केला नाही. त्यामुळे सलमानला असुरक्षित वाटत होतं. त्याला जाणून घ्यायचं होतं, ऐश्वर्याच्या मनात नक्की काय होतं. पण आता ऐश्वर्या सर्वांसमोर रडत असते…’ असं सोहैल म्हणाला होता.

ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा…

अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. पण यावर दोघांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. अभिषेक – ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगलेली असताना अभिनेत्याचं नाव अभिनेत्री निम्रत कौर हिच्यासोबत जोडलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक – निम्रत यांच्या अफेअरची चर्चा रंगली आहे. ज्यामुळे दोघांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा