सोनाक्षी सिन्हा हिला सोडून चक्क या बॉलिवूड अभिनेत्रीसोबत जहीर इक्बाल, हातात हात घालून दोघे..
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्रपटांपेक्षाही अधिक खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. सोनाक्षीने जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. तब्बल सात वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केले. सोनाक्षी आणि जहीर कायमच एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात.

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. अनेक वर्ष डेट केल्यानंतर सोनाक्षी सिन्हा हिने जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. मात्र, सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नानंतर लोकांनी भुवया उंचावल्या. कित्येक वर्ष जहीरसोबतचे नाते सोनाक्षी हिने आपल्या आई वडिलांपासूनही लपवून ठेवले. सोनाक्षीवर सर्वात अगोदर तिच्या आईला संशय आला. वडिलांना या लग्नासाठी राजी करण्यासाठी तब्बल तीन वर्ष सोनाक्षी सिन्हा हिला लागली. सोनाक्षी आणि जहीरची पहिली भेट सलमान खान याच्या घरी झाली होती. सोनाक्षी सिन्हा हिचे सासरे खूप मोठे व्यावसायिक असून थेट सलमान खान याचे मित्र आहेत. जहीर इक्बाल याला सलमान खान यानेच आपल्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांचे खास व्हिडीओ कायमच सोशल मीडियावर व्हायरल होतात.
सध्या जहीर इक्बाल याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान चर्चेचा विषय ठरलाय. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये जहीर इक्बाल याच्यासोबत सोनाक्षी सिन्हा नाही तर दुसरीच एक अभिनेत्री दिसत आहे. त्या अभिनेत्रीसोबत हातात हात घालून फोटोसाठी पोझ देताना जहीर इक्बाल दिसतोय. व्हायरल होणाख्या व्हिडीओनंतर विविध चर्चा रंगत असून सोनाक्षी कुठे असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये जहीर इक्बाल हा हुमा कुरेशी हिला आपल्या जवळ बोलवतो. त्यानंतर तिच्या गळ्यात हात घालून जहीर फोटोसाठी पोझ देताना दिसतोय. त्यानंतर जहीरच्या हातामध्ये हात घालून हुमा कुरेशी फोटो काढताना दिसत आहे. यावेळी दोघेजण बोलत हसताना देखील दिसत आहेत. आता हाच व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून सर्वांना सोनाक्षी सिन्हा हिची आठवण येतंय.
सोनाक्षी सिन्हा हिने जहीर इक्बाल याच्यासोबत सिव्हिल मॅरेज केले. सोनाक्षीच्या लग्नाला अत्यंत जवळचे लोक उपस्थित होते. त्यानंतर जय्यत पार्टीचे आयोजन सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल याच्याकडून मुंबईत करण्यात आले. या पार्टीला अनेक बॉलिवूड कलाकार पोहोचले. जहीर इक्बाल आणि हुमा कुरेशी यांचा हा व्हिडीओ तसा जुनाच आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
