AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाच्या चर्चांवर अखेर सोनाक्षी सिन्हाने सोडलं मौन; म्हणाली “माझ्या लग्नाशी कोणाचंच..”

अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. येत्या 23 जून रोजी सोनाक्षी तिच्या बॉयफ्रेंडशी लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. लग्नाच्या या चर्चांवर अखेर सोनाक्षीने मौन सोडलं आहे.

लग्नाच्या चर्चांवर अखेर सोनाक्षी सिन्हाने सोडलं मौन; म्हणाली माझ्या लग्नाशी कोणाचंच..
Sonakshi SinhaImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 11, 2024 | 11:51 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या जोरदार चर्चा आहेत. बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी ती येत्या 23 जून रोजी लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे. झहीर हा इक्बाल रतन्सी यांचा मुलगा आहे. इक्बाल हे अभिनेता सलमान खानचे खास मित्र आहेत. तर इक्बाल यांचा भाऊ सनम रतन्सी हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी स्टायलिस्ट आहे. झहीरला सलमान खाननेच बॉलिवूडमध्ये लाँच केलंय. सोनाक्षी आणि झहीर हे गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. मात्र माध्यमांसमोर त्यांनी कधीच प्रेमाची जाहीर कबुली दिली नाही. आता लग्नाच्या चर्चांवर अखेर सोनाक्षीने मौन सोडलं आहे.

सोनाक्षीची प्रतिक्रिया

‘आयडिवा’ला दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षी म्हणाली, “मला प्रत्येकवेळी लग्नाबद्दल प्रश्न विचारला जातो. मी हा प्रश्न एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडून देते. सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे, याच्याशी कोणाचं काहीच देणंघेणं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ही माझी पसंत आहे. त्यामुळे माझ्या लग्नाबद्दल लोकांना इतकी का काळजी आहे, तेच मला कळत नाही. माझ्या आईवडिलांपेक्षा जास्त मला लोक याविषयी प्रश्न विचारतात. त्यामुळे मला हे आणखीनच मजेशीर वाटतं. आता मला या प्रश्नांची सवय झाली आहे. मला त्याचाही आता त्रास होत नाही. लोकांना उत्सुकता असेल.. पण त्याचं मी तरी काय करू शकते?”

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

काय म्हणाले शत्रुघ्न सिन्हा?

दुसरीकडे सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी लग्नाविषयी कोणतीच माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. शत्रुघ्न म्हणाले, “मी सध्या दिल्लीत आहे. निवडणूक निकालानंतर मी इथे आलोय. माझ्या मुलीच्या लग्नाच्या प्लॅन्सविषयी माझं अजून कोणाशी काही बोलणं झालं नाही. तुमचा प्रश्न आहे की ती लग्न करतेय का? तर माझं उत्तर असं आहे की मला तिने अद्याप काहीच सांगितलं नाही. मलासुद्धा तितकंच माहीत आहे जितकं मी मीडियामध्ये वाचतोय. जेव्हा ती आम्हाला सांगेल, तेव्हा मी आणि माझी पत्नी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी जाऊ. ती नेहमी खुश राहावी, हीच आमची इच्छा आहे. आम्हाला आमच्या मुलीच्या निर्णयावर पूर्ण विश्वास आहे. ती कधीच कोणता चुकीचा निर्णय घेणार नाही.”

कोण आहे झहीर इक्बाल?

सोनाक्षीचा बॉयफ्रेंड झहीर हा त्याच्या लहानपणापासूनच सलमानचा खूप मोठा चाहता आहे आणि त्यालाच तो मार्गदर्शक मानतो. सलमानची बहीण अर्पिता खानसोबत त्याने शालेय शिक्षण पूर्ण केलंय. सलमाननेच झहीरला बॉलिवूडमध्ये लाँच केलं. 2019 मध्ये ‘नोटबुक’ या चित्रपटातून त्याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. यामध्ये अभिनेते मोहनिश बहल यांची मुलगी प्रनुतन बहल हिने झहीरसोबत मुख्य भूमिका साकारली होती. ‘नोटबुक’ या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली होती. मात्र बॉक्स ऑफिसवर त्याला फारसं यश मिळालं नाही. सोनाक्षीच्या आधी झहीरचं नाव दीक्षा सेठ आणि सना सईद या अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.