AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonu Nigam | सोनू निगमला वाचवताना जखमी झालेला रब्बानी खान आहे तरी कोण? का होतेय इतकी चर्चा?

रब्बानीने धक्काबुक्कीदरम्यान सोनू निगमला वाचवलं खरं, मात्र त्यात तो स्वत: जखमी झाला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सोनू निगमला वाचवणारा रब्बानी खान आहे तरी कोण, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

Sonu Nigam | सोनू निगमला वाचवताना जखमी झालेला रब्बानी खान आहे तरी कोण? का होतेय इतकी चर्चा?
Sonu Nigam and Rabbani KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 21, 2023 | 12:28 PM
Share

मुंबई: चेंबूरमध्ये सोमवारी रात्री लाइव्ह कॉन्सर्टनंतर गायक सोनू निगमसोबत धक्काबुक्कीची घटना घडली. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांचा पुत्र स्वप्निल फातर्पेकरला सोनू निगमसोबत सेल्फी क्लिक करायचा होता. मात्र त्यावेळी बॉडीगार्डने अडवल्यामुळे त्याने धक्काबुक्की केली. यावेळी सोनू निगमला वाचवण्यासाठी त्याचा मित्र रब्बानी खान समोर आला. रब्बानीने धक्काबुक्कीदरम्यान सोनू निगमला वाचवलं खरं, मात्र त्यात तो स्वत: जखमी झाला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सोनू निगमला वाचवणारा रब्बानी खान आहे तरी कोण, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

रब्बानी मुस्तफा खान हा सोनू निगमचा मित्र आणि बॉलिवूड गायक आहे. धक्काबुक्कीच्या घटनेवेळी तो सोनूसोबतच होता. जेव्हा सोनूसोबत सेल्फी घेण्यावरून धक्काबुक्की करण्यात आली, तेव्हा रब्बानीने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि स्वत: पायऱ्यांवरून खाली पडला. पायऱ्यांवरून पडल्याने त्याला दुखापतही झाली. रब्बानीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला.

पहा धक्काबुक्कीचा व्हिडीओ

कोण आहे रब्बानी खान?

रब्बानी मुस्तफा खान हा प्रसिद्ध गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचा मुलगा आहे. आपल्या वडिलांच्या गायकीचा वारसा तो पुढे चालवत आहे. रब्बानीने ‘सरबजीत’ या चित्रपटातील ‘अल्लाह हू अल्लाह’ आणि ‘फौजी कॉलिंग’मधील ‘पीर मेरी पिया जाने ना’ ही गाणी गायली आहेत. या दोन्ही गाण्यांमुळे त्याला संगीतविश्वात ओळख मिळाली.

नेमकं काय घडलं होतं?

“माझ्याकडे एक व्यक्ती सेल्फीसाठी आली होती. मी नकार दिल्यानंतर त्याने मला अडवलं. नंतर समजलं की तो आमदार प्रकाश फातर्पेकर यांचा मुलगा स्वप्निल फातर्पेकर आहे. मला वाचवण्यासाठी हरीप्रसाद मध्ये आले. त्याने त्यांनाही धक्का दिला, त्यानंतर मला धक्का दिला. धक्क्यामुळे मी खाली पडलो. मला वाचवण्यासाठी रब्बानी पुढे आले तर त्यांनाही धक्का दिला. ते थोडक्यात बचावले, नाहीतर त्यांना गंभीर दुखापत झाली असती. त्यात त्यांचे प्राणही जाऊ शकले असते. रब्बानी यांचं नशिब चांगलं होतं की खाली कोणती लोखंडी वस्तू नव्हती”, असं सोनू निगमने सांगितलं.

मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.