माधुरी दीक्षितच्या शोमध्ये कोरोनाचा विस्फोट, एकापाठोपाठ 18 जणांना संसर्ग, कुणाकुणाला लागण?

भिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) परीक्षकाची भूमिका पार पाडत असलेल्या 'डान्स दिवाने' (Dance deewane) या शोच्या सीझन 3मध्ये  तब्बल 18 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे.

माधुरी दीक्षितच्या शोमध्ये कोरोनाचा विस्फोट, एकापाठोपाठ 18 जणांना संसर्ग, कुणाकुणाला लागण?
डान्स दिवाने सीझन 3

मुंबई : एकीकडे कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी जोरदार लसीकरण मोहीम सुरू असताना, दुसरीकडे कोरोना (Corona Virus) रुग्णांची वाढती संख्या थांबता थांबतच नाहीय. कोरोनामुळे एका प्रसिद्ध डान्स रिअॅलिटी शोच्या सेटवर प्रचंड मोठा हाहाकार माजला आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) परीक्षकाची भूमिका पार पाडत असलेल्या ‘डान्स दिवाने’ (Dance deewane) या शोच्या सीझन 3मध्ये  तब्बल 18 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या कारणामुळे सध्या सेटवरील सर्व लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षितसह डान्सर धर्मेश येलांडे (Dharmesh Yelande) आणि तुषार कालिया (Tushar kalia) हा कार्यक्रम होस्ट करत आहेत (Sony tv presents madhuri dixit show Dance deewane 18 crew members tested corona positive).

एका प्रसिद्ध बेवसाईटच्या वृत्तानुसार, ‘डान्स दिवाने’ सीझन 3च्या सेटवरील 18 क्रू मेंबर्सचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. क्रू मेंबर कोरोना संक्रमित झाल्याची बातमी समोर आल्यानंतर, या कार्यक्रमाच्या गोरेगाव फिल्मसिटी स्थित सेटवर मोठा गोंधळ माजला आहे. या प्रकरणात, एफडब्ल्यूईसीएसचे (FWICE) सरचिटणीस अशोक दुबे यांनी एका अग्रगण्य दैनिकाशी बोलताना सांगितले की, ‘जे काही घडले ते दुर्दैवी होते. आमची प्रार्थना आहे की, ज्यांना संसर्ग झाला आहे ते लवकर बरे व्हावेत’.

कोणाकोणाला झाली लागण?

सध्या केवळ शोच्या क्रू मेंबर्सना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. यात अद्याप कोणताही स्पर्धक किंवा परीक्षक यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलेले नाही .

त्यांनी सांगितले की, ‘या शोची शूटिंग सुरु होण्याआधी त्यातील सहभागी कलाकार आणि सर्व क्रू मेम्बर्सची अगोदरच कोरोना चाचणी केली जाते, आणि म्हणूनच त्यांच्याकडे आता नवीन क्रू बोलवण्यासाठी थोडा वेळ आहे. या शोचे पुढील शूट 5 एप्रिल रोजी होणार असून, त्यावेळी पुन्हा एकदा सगळ्यांची प्री-टेस्ट होणार आहे. जे कोरोना-निगेटिव्ह असतील, केवळ त्यांनाच शूटिंगची परवानगी दिली जाईल. परंतु, यानंतरही सेटवर बरीच सावधगिरी बाळगली जाईल.’(Sony tv presents madhuri dixit show Dance deewane 18 crew members tested corona positive)

कोरोनाचा कहर

गेल्या काही दिवसांत बॉलिवूडपासून टीव्ही इंडस्ट्रीपर्यंत अनेक सेलिब्रिटी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. तथापि, बर्‍याच जणांनी कोरोनावर यशस्वी रित्या मात केली आहे आणि ते यातून बरे झाले आहेत. काही कलाकार पुन्हा एकदा कामावर देखील परतले आहेत. आता ‘डान्स दिवाने’च्या सेटवर मात्र पुढे काय घडणार आणि त्याचा या कार्यक्रमावर परिणाम काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Sony tv presents madhuri dixit show Dance deewane 18 crew members tested corona positive)

हेही वाचा :

Saleel Kulkarni Corona | सर्वतोपरी काळजी घेऊनही टेस्ट पॉझिटिव्ह, गायक सलील कुलकर्णी कोरोनाबाधित

शादाब बटाटाने तोंड उघडलं, NCB ने बॉलिवूड अभिनेत्याला मुंबई विमानतळावरुन उचललं

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI