AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | गर्लफ्रेंडला मारहाण करणाऱ्या तरुणाला अभिनेत्याने भररस्त्यात शिकवला धडा; नेटकरी म्हणाले ‘हाच खरा हिरो’

'बऱ्याच कालावधीनंतर एक चांगला नागरिक पाहिला,' असं एकाने लिहिलं आहे. तर 'हा खरा हिरो आहे', अशा शब्दांत इतर नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. मारहाण करणाऱ्या बॉयफ्रेंडची बाजू घेणाऱ्या त्या तरुणीवरही काही नेटकऱ्यांनी टीका केली आहे.

Video | गर्लफ्रेंडला मारहाण करणाऱ्या तरुणाला अभिनेत्याने भररस्त्यात शिकवला धडा; नेटकरी म्हणाले 'हाच खरा हिरो'
Naga ShouryaImage Credit source: Twitter
| Updated on: Mar 02, 2023 | 7:59 AM
Share

हैदराबाद : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकार हे फक्त ‘रिल लाइफ हिरो’ नाही तर ‘रिअल लाइफ हिरो’सुद्धा असतात, म्हणूनच चाहत्यांना ते फार जवळचे वाटतात, असं म्हटलं जातं. याच कारणामुळे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांचा फॅन फॉलोईंग खूप मोठा असतो. चाहते त्यांना देवाप्रमाणे पूजतात. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. तेलुगू अभिनेता नाग शौर्य याने भर रस्त्यात अशी कामगिरी केली, ज्यानंतर त्याला चाहते ‘रिअल लाइफ हिरो’ म्हणत आहेत. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती त्याच्या गर्लफ्रेंडला भर रस्त्यात मारहाण करत असताना नाग शौर्यने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये गर्लफ्रेंडला मारहाण करणाऱ्या संबंधित व्यक्तीशी नाग शौर्य रागाने बोलताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर तो व्यक्ती तिथून जाऊ लागला तेव्हा नाग शौर्यने त्याचा हात धरून थांबवलं आणि मारहाण थांबवण्यास सांगितलं. “तू तिला रस्त्यावर का मारलंस? ती तुझी गर्लफ्रेंड असू शकते, पण त्यामुळे तू तिच्यासोबत वाटेल तसा वागू शकत नाही. तिची माफी माग”, असं तो रागाने त्या व्यक्तीशी बोलताना दिसतो.

विशेष म्हणजे ही घटना भर रस्त्यात घडत होती आणि आजूबाजूने गाड्या धावत होत्या. नेमकं काय घडतंय हे पाहण्यासाठी काही जण तिथे जमतात आणि तेव्हाच हा व्हिडीओ संपतो. हा व्हिडीओ मंगळवारी हैदराबादमध्ये शूट करण्यात आला होता. महिलेला मारहाण करताना पाहून नाग शौर्यने त्याची कार थांबवली होती. त्यानंतर बाहेर येत त्याने मारहाण करणाऱ्या तरुणाला धडा शिकवला होता. रस्त्यावर भांडणारी ही दोघं गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असल्याचं समजल्यावर त्याने तरुणाला तिची माफी मागण्यास सांगितलं.

पहा व्हिडीओ

नाग शौर्यच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘बऱ्याच कालावधीनंतर एक चांगला नागरिक पाहिला,’ असं एकाने लिहिलं आहे. तर ‘हा खरा हिरो आहे’, अशा शब्दांत इतर नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. मारहाण करणाऱ्या बॉयफ्रेंडची बाजू घेणाऱ्या त्या तरुणीवरही काही नेटकऱ्यांनी टीका केली आहे.

कोण आहे नाग शौर्य?

नाग शौर्य अभिनेत्यासोबतच उत्तम लेखक आणि निर्मातासुद्धा आहे. 2011 मध्ये त्याने ‘क्रिकेट, गर्ल्स अँड बीअर’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘चंदामामा कथलू’मध्येही त्याने भूमिका साकारली आहे. ‘ओ बेबी’ या चित्रपटात त्याने समंथा रुथ प्रभूसोबत स्क्रीन शेअर केला होता. काही दिवसांपूर्वीच तो लग्नबंधनात अडकला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.