jay bhim movie : ‘जय भीम’ ऑस्करच्या यूट्यूबवर दिसणार, ‘हा’ मान मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट, ‘सुर्या’च्या कामाचा आणखी एक रेकॉर्ड

jay bhim movie : 'जय भीम' ऑस्करच्या यूट्यूबवर दिसणार,  'हा' मान मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट, 'सुर्या'च्या कामाचा आणखी एक रेकॉर्ड
जय भीम

मुंबई : ‘जय भीम’ ( jay bhim)  या सिनेमाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले. आज या चित्रपटाने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. ‘जय भीम’ हा दाक्षिनात्य सिनेमा आता ऑस्करच्या यूट्यूब (Oscar youtube) चॅनेलवर दिसणार आहे. हा मान मिळणारा ‘जय भीम हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे’ Yet another feather in the hat for […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Jan 18, 2022 | 4:32 PM

मुंबई : ‘जय भीम’ ( jay bhim)  या सिनेमाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले. आज या चित्रपटाने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. ‘जय भीम’ हा दाक्षिनात्य सिनेमा आता ऑस्करच्या यूट्यूब (Oscar youtube) चॅनेलवर दिसणार आहे. हा मान मिळणारा ‘जय भीम हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे’

‘जयभीम’ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

काही दिवसांपूर्वी IMDB ने 2021 मधल्या लोकप्रिय चित्रपटांची यादी जाहीर केली. यात ‘जय भीम’ सिनेमाचं स्थान प्रथम क्रमांकाचं होतं. इतरही अनेक पुरस्कार या चित्रपटाला प्राप्त झाले. याचसोबत हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. आणि ‘जय भीम’ हा दाक्षिनात्य सिनेमा आता ऑस्करच्या यूट्यूब चॅनेलवर दिसणार आहे.

सिनेमाची गोष्ट काय आहे?

हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. अन्यायग्रस्त कुटुंब आणि त्यांच्या पाठिशी खंबिरपणे उभा राहणारा वकिल यांचा प्रस्थापितांविरुद्धचा संघर्ष अशी या सिनेमाची गोष्ट आहे. हा सिनेमा मागच्या वर्षी लाखो चाहत्यांच्या पसंतीस उतरला.

‘जय भीम’ चित्रपट 4 नोव्हेंबर 2021 ला Amazon Prime Video वर प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे बजेट 10 कोटींहून अधिक होते आणि साऊथचा सुपरस्टार सुर्याने या चित्रपटात न्यायमूर्ती चंद्रूची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. खर्चापेक्षा कितीतरी पटीने अधिक कमाई या चित्रपटाने केली.

संबंधित बातम्या

जुईली जोगळेकर आणि रोहित राऊत लग्नबंधनात अडकणार? त्या ‘काऊटडाऊन’मुळे सोशल मीडियावर चर्चा

Dhanush aishwarya Divorce : अभिनेता धनुष-ऐश्वर्याच्या घटस्फोटानंतर चाहत्यांमध्ये नाराजी तर राम गोपाल वर्मा म्हणतात,’घटस्फोटाचा उत्सव साजरा करा!’

Dhanush Aishwarya Divorce : धनुषने ऐश्वर्यापासून वेगळं होताच ऐश्वर्याची बहिण सौंदर्याची काय होती प्रतिक्रिया, जाणून घ्या!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें