Bikramjeet Kanwarpal | कोरोनाने आणखी एक गुणी अभिनेता हिरावला, बिक्रमजीत कंवरपाल यांचे निधन

पेज थ्री, रॉकेट सिंग, गाझी अटॅक, टू स्टेट्स यासारख्या अनेक चित्रपटात बिक्रमजीत कंवरपाल यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत (Actor Bikramjeet Kanwarpal Corona)

Bikramjeet Kanwarpal | कोरोनाने आणखी एक गुणी अभिनेता हिरावला, बिक्रमजीत कंवरपाल यांचे निधन
अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल
Follow us
| Updated on: May 01, 2021 | 12:27 PM

मुंबई : कोरोनाच्या फटक्याने आणखी एका हरहुन्नरी अभिनेत्याला काळाच्या पडद्याआड नेलं. लोकप्रिय अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल (Bikramjeet Kanwarpal) यांचे कोरोना संसर्गाने निधन झाले. वयाच्या अवघ्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बिक्रमजीत कंवरपाल यांच्या भूमिका असलेले अनेक चित्रपट, मालिका आणि वेब सीरिज गाजले आहेत. (Special OPS Actor Bikramjeet Kanwarpal Dies Of Corona)

कोरोना संसर्गानंतर उपचार सुरु असताना बिक्रमजीत कंवरपाल यांची प्राणज्योत मालवली. पेज थ्री, रॉकेट सिंग, गाझी अटॅक, टू स्टेट्स यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. स्पेशल ऑप्स या वेब सीरीजमधील त्यांची भूमिका प्रचंड गाजली होती.

अशोक पंडित यांचे ट्वीट

चित्रपट दिग्दर्शक अशोक पंडित यांनी ट्विटरवरुन बिक्रमजीत कंवरपाल यांच्या निधनाची दुःखद बातमी दिली. “गुणी अभिनेता मेजर बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोना संसर्गाने आज सकाळी निधन झाल्याची दुःखद वार्ता समजली. निवृत्ती सैन्य अधिकारी कंवरपाल यांनी अनेक सिनेमा आणि टीव्ही मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. त्यांचे कुटुंबीय आणि प्रियजनांचे सांत्वन” असे ट्वीट अशोक पंडित यांनी केले आहे.

सैन्यदलातून निवृत्तीनंतर अभिनयात पदार्पण

बिक्रमजीत कंवरपाल यांनी 2003 मध्ये सैन्यदलातून निवृत्ती घेतल्यानंतर अभिनयात पदार्पण केलं. पेज थ्री, रॉकेट सिंग – सेल्समन ऑफ दि इयर, आरक्षण, मर्डर टू, द गाझी अटॅक, टू स्टेट्स यासारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे. दिया और बाती हम, ये है चाहते, दिल ही तो है, अनिल कपूर यांची 24 या टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी भूमिका केल्या आहेत. (Actor Bikramjeet Kanwarpal Corona)

बिक्रमजीत कंवरपाल यांचे गाजलेले चित्रपट :

पेज थ्री पाप करम कॉर्पोरेट हायजॅक आरक्षण मर्डर टू रॉकेट सिंग – सेल्समन ऑफ दि इयर द गाझी अटॅक टू स्टेट्स जब तक है जान ग्रँड मस्ती हे बेबी प्रेम रतन धन पायो

संबंधित बातम्या :

लोकप्रिय न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन, कोरोनावरील उपचारादरम्यान हृदयविकाराचा धक्का

‘कोर्ट’ चित्रपटातील अभिनेते वीरा साथीदार यांचे कोरोनाने निधन

(Special OPS Actor Bikramjeet Kanwarpal Dies Of Corona)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.