AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Story | Upcoming Web Series| द फॅमिली मॅन 2 पासून बँग-बँगपर्यंत धमाकेदार 9 सीरीज रिलीज होणार!

मागील वर्ष कोरोनामुळे सर्वांसाठीच अतिशय कठीण गेले. मात्र, यासर्वांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मला एक वेगळी ओळख मिळाली. लॉकडाउन दरम्यान, उत्कृष्ट वेब सीरीज आणि चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले.

Special Story | Upcoming Web Series| द फॅमिली मॅन 2 पासून बँग-बँगपर्यंत धमाकेदार 9 सीरीज रिलीज होणार!
| Updated on: Jan 24, 2021 | 7:58 AM
Share

मुंबई : मागील वर्ष कोरोनामुळे सर्वांसाठीच अतिशय कठीण गेले. मात्र, यासर्वांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मला एक वेगळी ओळख मिळाली. लॉकडाउन दरम्यान, उत्कृष्ट वेब सीरीज आणि चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले. हे वर्ष ओटीटीसाठी खूप चांगले ठरले आहे. यावर्षी बरेच मोठे ब्लॉकबस्टर चित्रपट आणि वेब सीरीज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता. (Special Story On Web series Ott Platform release in 2021 year)

पाकिस्तानातून आलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील ताज हॉटेलसह सहा ठिकाणी हल्ला केला होता. हल्ल्यानंतर मुंबईसह संपूर्ण देश हादरला होता. या दहशतवादी हल्ल्यांत 160हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. आता अमेजॉन प्राइम याच हल्लावर आधारित मुंबई डायरीज 26/11 ही वेब सीरीज आणत आहे, मार्च 2021 मध्ये ही वेब सीरीज प्रदर्शित होईल. याचे पहिले लूकही प्रदर्शित झाले आहे.

web 3

बाहुबली चित्रपटातून प्रसिद्ध झालेला भल्लालदेव अर्थात राणा डग्गुबाती (Rana Daggubati) यावर्षी डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले नशीब आजमावणार आहे. चित्रपटांमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर तो आता वेब सीरीजमध्ये दिसणार आहे. 2021 मध्ये राणा डग्गुबाती वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. अमेरिकन वेब सीरीज ‘रे डोनोवन’ ची ही वेब सीरीज रीमेक असणार आहे.

बॉलिवूड स्टार अमित साध (Amit Sadh) ‘जीत की जिद’ (Jeet ki Zid) ही वेब सीरीज यावर्षी जानेवारीत रिलीज होणार आहे. यामध्ये कारगिल युद्धाचा भाग असलेल्या एका भारतीय सैनिकांची ही कहाणी आहे.

‘ब्रोकन बट ब्यूटीफुल’ (Broken But Beautiful) या वेब सीरीजचा तिसरा सीझनही येणार आहे. ही वेब सीरीज फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे. आगामी हंगामात सिद्धार्थ शुक्ला मुख्य भूमिकेत असेल.

web 2

अभिनेता आणि टिकटॉकर मिस्टर फैजू ची ‘बँग बाँग’ वेब सीरिज या महिन्यात जी 5 वर रिलीज होईल. या वेब सीरिजमध्ये रुही सिंग फैजूबरोबर दिसणार आहे. मालिकेची कहाणी एक अ‍ॅक्शन थ्रिलर आहे.

बॉलिवूडची अभिनेत्री सनी लियोनीने सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या चाहत्यांसह एक चांगली बातमी शेअर केली आहे. सनीने तिच्या चाहत्यांना सांगितले आहे की, तिने तिच्या ‘अनामिका’ या नवीन वेब सीरिजचे शुटिंग सुरू केले आहे. विक्रम भट्ट या वेब सिरिजचे दिग्दर्शन करताना दिसणार आहेत. या वेब सीरिजचे ते लेखकही आहेत, सनी लिओनी आणि विक्रम भट्ट प्रथमच एकत्र काम करत आहेत.

बॉलिवूड चित्रपट निर्माती एकता कपूरच्या अल्ट बालाजी वेबसीरीज अॅपचा महत्त्वाकांक्षी आणि बहुचर्चित ‘पौरषपूर’चा टीझर नुकतंच प्रदर्शित करण्यात आला. या वेबसीरीजमध्ये झळकणाऱ्या सर्वच कलाकार एका वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. अभिनेता मिलिंद सोमण याचा या वेबसीरीजमध्ये अनोखा लूक पाहायला मिळत आहे. यामुळे मिलिंद सोमणच्या चाहत्यांसाठी ही वेबसीरीज अनोखी पर्वणी ठरत आहे.

web 1

अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या नेतृत्वाखालील ‘जिसिम्स’ची निर्मिती असलेली बहुप्रतीक्षित वेब सीरीज ‘नक्षलबारी’ (Naxalbari) लवकरच प्रदर्शित होणार आहे. कोव्हिड लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण जग हे स्तिमित झालेले असताना अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या नेतृत्वाखालील ‘जिसिम्स’ने मनोरंजन क्षेत्रातील निर्मितीसाठी एक वेगळा मार्ग धुंडाळला आणि आपल्या वेब सीरीजचे गोवा येथे चित्रीकरण पूर्ण केले. राजीव खंडेलवालची ही वेब सीरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

द फॅमिली मॅन 2 (The Family Man) या वेब सीरीजचे दुसरे सीझन प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहेय पहिले सीझन सुपरहिट ठरल्यानंतर चाहते आता दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाढ पाहात आहेत. 2021 मध्ये फेब्रुवारीमध्ये द फॅमिली मॅन 2 ही बेव सीरीज चाहत्यांच्या भेटीली येण्याची शक्यता आहे.

(Special Story On Web series Ott Platform release in 2021 year)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.