AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कुठं जगातील सर्वात मोठा कोरोना लस उत्पादक देश, कुठं आपण?’, भारताच्या प्रशंसेमुळे पाकिस्तानचा पत्रकार ट्रोल

अनेकदा आपल्याच देशाची चिकित्सा किंवा टीकेला थेट देशद्रोह म्हणत विरोधकांना झोडपून काढण्याचे प्रकार होतात. असाच प्रकार पाकिस्तानमध्ये (Pakistan) पाहायला मिळतोय.

'कुठं जगातील सर्वात मोठा कोरोना लस उत्पादक देश, कुठं आपण?', भारताच्या प्रशंसेमुळे पाकिस्तानचा पत्रकार ट्रोल
| Updated on: Jan 21, 2021 | 5:38 PM
Share

इस्लामाबाद : अनेकदा आपल्याच देशाची चिकित्सा किंवा टीकेला थेट देशद्रोह म्हणत विरोधकांना झोडपून काढण्याचे प्रकार होतात. असाच प्रकार पाकिस्तानमध्ये (Pakistan) पाहायला मिळतोय. पाकिस्तानमधील इकरार उल हसन (Iqrar Ul Hassan) या न्यूज अँकरने पाकिस्तानमधील चुकांवर बोट ठेवत त्याची तुलना भारताशी केल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. पत्रकार हसन यांनी कोरोना लस निर्मितीपासून पाकिस्तानमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेपर्यंत पाकिस्तानची तुलना भारताशी केली. यातून पाकिस्तानमध्ये किती सुधारणा होणं बाकी आहे हेच त्याने अधोरेखित केलं. मात्र, यावरुन त्यांना थेट देशद्रोही ठरवलं जातंय (Pakistani News anchor Iqrar Hassan praises India on many issues get trolled).

इकरार उल हसन यांनी पाकिस्तानमधील त्रुटींवर बोट ठेवत ट्विट्सची मालिकाच केली. यात हसन म्हणाले, “भारत विरुद्ध पाकिस्तान. भारत जगातील सर्वात मोठा कोरोना लस उत्पादक देश आहे. दुसरीकडे पाकिस्तानमध्ये कोरोना लस तयार करणं तर दूरच, पण कोरोना लसीची ऑर्डर दिलीय की नाही हेही माहिती नाही. स्पर्धाच करायची असेल तर शिक्षणात करावी, विज्ञानात करावी, खेळात करावी, मूलभूत सुविधांमध्ये करावी, अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञानात करावी आणि सत्याचा सामना करावा.’

हसन यांनी भारत आणि पाकिस्तानमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचीही तुलना केली. या ट्विटमध्ये त्यांनी पाकिस्तानच्या वाहतूक व्यवस्थेतील बस अगदी निकामी होत आलेली, जर्जर दाखवली, तर भारतातील वाहतूक व्यवस्था अधिक चांगली असल्याचं दाखवलं. दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी पाकिस्तानचा पासपोर्ट आणि चलनाचीही तुलना केली. पाकिस्तानच्या चलनाची किंमत अनेक दक्षिण आशियातील देशांपेक्षा कमी असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. तसेच पाकिस्तानच्या पासपोर्टला सोमालिया किंवा अफगानिस्तानसारख्या मागास देशांच्या पासपोर्टइतकीच किंमत असल्याचं म्हटलं.

‘भारताच्या 1 रुपयाची किंमत पाकिस्तानमध्ये 2.20 रुपये’

“बांग्लादेशच्या 1 रुपयाची किंमत पाकिस्तानचा 1.90 रुपये इतकी आहे. दुसरीकडे भारताच्या 1 रुपयाची किंमत पाकिस्तानमध्ये 2.20 रुपये आहे. अल्ला आम्हाला पाकिस्तानला खऱ्या अर्थाने जिंदाबाद करण्याची क्षमता देवो.’ हसन पाकिस्तानमधील एका चॅनलवर सर-ए-आम नावाच्या टिव्ही शोचं निवेदन करतात. मात्र, पाकिस्तानमधील सुधारणांवर बोट ठेवणाऱ्या हसन यांना त्यांच्याच देशातील लोक देशद्रोही ठरवत आहेत. त्यांच्याविरोधात ट्विटरवर मोहिमच उघडण्यात आलीय. तसेच हसन यांच्या माफीची मागणी होत आहे. असं असलं तरी पाकिस्तानमधील अनेक सेलिब्रेटींसह खेळाडूंनी हसन यांच्या भूमिकेला पाठिंबा दिलाय.

पाकिस्तानचा प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर म्हणाला, “कुणावरही टीका करण्याआधी ती व्यक्ती काय सांगत आहे हे समजून घेतलं पाहिजे. पाकिस्तानवरील इकरार उल हसन यांच्या प्रेमावर कुणीही शंका घ्यावी असं काहीही घडलेलं नाही.’ क्रिकेटर कामरान अकमल म्हणाला, ‘आपण केवळ या ट्विट्सवरुन हसन यांचा देशप्रेम ठरवू शकत नाही. हसन यांना आपल्या देशातील वाहतूक व्यवस्था चांगली हवी आहे. यात काहीच चुकीचं नाही. गायक अली जफर आणि अभिनेता इमरान अशरफ यांनीही हसन यांना पाठिंबा दिलाय.

हेही वाचा :

Team India | जेव्हा शार्दुल, अजिंक्यचा दिवाना झाला पाकिस्तान

प्रजासत्ताक दिनी पाकिस्तानचा काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट

अब्जावधींची सोन्याची खाण बघून पाकिस्तानची नजर फिरली, पैशांच्या मोहात मोठी चूक, आता 44 हजार कोटींचा दंड

व्हिडीओ पाहा :

Pakistani News anchor Iqrar Hassan praises India on many issues get trolled

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.