AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘स्प्लिट्सविला’ने ओलांडल्या सर्व मर्यादा; सँडलच्या हिलने मारलं, ओठांतून रक्त.. भडकले प्रेक्षक

'स्प्लिट्सविला' या शोमध्ये दोन स्पर्धकांमध्ये झालेलं भांडण सध्या चांगलंच चर्चेत आहे. आकांशा चौधरीने दीक्षा पवारविरोधात धक्कादायक दावे केले आहेत. दीक्षाने तिला निर्दयीपणे मारल्याची पोस्ट तिने इन्स्टाग्रामवर लिहिली आहे.

'स्प्लिट्सविला'ने ओलांडल्या सर्व मर्यादा; सँडलच्या हिलने मारलं, ओठांतून रक्त.. भडकले प्रेक्षक
आकांक्षा चौधरीImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 14, 2026 | 2:39 PM
Share

‘स्प्लिट्सविला’ हा अत्यंत वादगस्त शो आहे. बिग बॉस या शोप्रमाणेच यामध्येही बरीच भांडणं होतात. सध्या या शोचा सहावा सिझन सुरू असून त्यातही बरेच वादविवाद पहायला मिळत आहेत. आकांक्षा चौधरी आणि दीक्षा पवार यांच्यात जोरदार भांडण झालं आहे. दीक्षाने मारहाण केल्याचा आरोप आकांक्षाने केला आहे. इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत तिने तिची बाजू मांडली आहे. दीक्षाने मला हिलच्या सँडलने मारलं, माझ्या ओठांतून रक्त येत होतं, असं तिने त्यात म्हटलंय.

या पोस्टमध्ये आकांक्षाने लिहिलं, ‘हे फक्त भांडणं नव्हतं, तर ही हिंसा होती. मला हिलच्या सँडलने मारलं. तिने मला इतके कानाखाली मारले की माझ्या ओठातून रक्तच येऊ लागलं होतं. माझ्या डोळ्यांखाली आणि मानेवर जखमेच्या खुणा आहेत. हे सर्व नॅशनल टीव्हीवर घडलंय, सर्वांसमोर. हा फोटो घटनेच्या 10-15 दिवसांनंतर काढण्यात आला, जेव्हा मला अखेर माझा फोन मिळाला होता. जखमा तेव्हासुद्धा ताज्या होत्या आणि सहज दिसत होत्या. हे सर्व सहन केल्यानंतर मला म्हटलं जातंय की, असं काही घडलंच नाही. जेव्हा लोक माझ्याबद्दल वाटेल ते बोलत होते, तेव्हा मी प्रत्येक दिवशी या जखमांसोबत जगत होती.’

‘त्यादिवशी मी आतून खूप कोसळले. मला सुन्न, एकटं आणि पूर्णपणे शटडाऊन झाल्यासारखं वाटत होतं. मला शो सोडायचा होता, पण मी तसं केलं नाही. कारण मी सोडून पळून जाणारी व्यक्ती नाही. आता मी वेदना, एकटेपणा या गोष्टींबाबत सुन्न झाले आहेत. त्यावर आता कोणतीच प्रतिक्रिया देत नाही’, असं तिने पुढे लिहिलं आहे.

‘स्प्लिट्सविला’ या शोमध्ये दिक्षा आणि आकांक्षा यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. दिक्षाने आकांक्षावर कपडे फेकायला सुरुवात केली होती. त्यानंतर सुझानसुद्धा त्यांच्या भांडणात पडली आणि तिने दिक्षावर कपडे फेकले. दिक्षा आणि आकांक्षाचं हे भांडण मारहाणीपर्यंत पोहोचलं होतं. या घटनेवर सनी लिओनीनेही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या भांडणाविषयी सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. शोमधील स्पर्धकांच्या सुरक्षेविषयीही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याप्रकरणी अद्याप दिक्षाकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही.

Follow Us
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले...
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स.....
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत.
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक.
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?.
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश.
पुणे दारूकांडानंतर संतापाचा स्फोट! युवक काँग्रेस, गुलाबो गँग अन्.....
पुणे दारूकांडानंतर संतापाचा स्फोट! युवक काँग्रेस, गुलाबो गँग अन्......
मराठा आरक्षणाबाबत विखे पाटील ॲक्शन मोडमध्ये, त्या अधिकाऱ्याला बजावली..
मराठा आरक्षणाबाबत विखे पाटील ॲक्शन मोडमध्ये, त्या अधिकाऱ्याला बजावली...
सावलीत बसा... अभ्यासक आल्यावर निर्णय घ्या, पाटलांची जरांगेंना विनंती
सावलीत बसा... अभ्यासक आल्यावर निर्णय घ्या, पाटलांची जरांगेंना विनंती.
7 वर्षे हे नेटवर्क कोणाच्या आशीर्वादाने? संजय राऊतांचा खळबळजनक सवाल
7 वर्षे हे नेटवर्क कोणाच्या आशीर्वादाने? संजय राऊतांचा खळबळजनक सवाल.