श्रीदेवी 2 वर्षे हॉटेलच्या त्या एकाच खोलीत का राहत होत्या? जेवण मात्र यायचं दुसऱ्याच ठिकाणाहून; शेफने सांगितली ती घटना
प्रसिद्ध शेफ हरपाल सिंग सोखी यांनी श्रीदेवीबाबत एक किस्सा सांगितला. त्यांनी सांगितले की त्यांच्या हॉटेलमध्ये श्रीदेवी तब्बल दोन वर्ष वास्तव्यासाठी होत्या. तसेच त्या कधीही त्या हॉटेलचं अन्न न खाता बाहेरून डब्बा मागवायच्या. हरपाल यांनी श्रीदेवीसोबतच अनेक बॉलिवूड स्टारचे किस्से सांगितले आहेत.

एकेकाळी मुंबईचा जुहू परिसर केवळ समुद्रकिनारे आणि बंगल्यांसाठीच नव्हे तर एका खास हॉटेलसाठीही प्रसिद्ध होता. हे हॉटेल म्हणजे सेंटॉर हॉटेल. हे असे ठिकाण होते जिथे बॉलिवूड स्टार्स राहत असतं. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या तेथील आठवणी आजही ताज्या आहेत. अशीच एक सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी देखील त्या हॉटेलमध्ये राहिल्या आहेत तेही तब्बल 2 वर्ष. त्यांचे अनेक रंजक किस्से देखील तिथे घडले आहेत. अलीकडेच, सिद्धार्थ कन्नन यांच्या मुलाखतीत, प्रसिद्ध शेफ हरपाल सिंग सोखी यांनी श्रीदेवीशी संबंधित अनेक मनोरंजक किस्से सांगितले. जेव्हा ते देखील याच जुहूमधील लोकप्रिय सेंटॉर हॉटेलमध्ये काम करत होते. हे हॉटेल एकेकाळी बॉलिवूड स्टार्सचे सर्वात मोठे हँगआउट होते.
श्रीदेवी का राहिल्या होत्या त्या हॉटेलमध्ये 2 वर्ष
श्रीदेवी सलग दोन वर्षे त्या हॉटेल एका खोलीत तब्बल 2 वर्ष राहिल्या. हो, त्यांनी त्यांची एक रुम निश्चित केली होती.आणि त्या तथेच राहणे पसंत करत असतं. पण दोन वर्ष त्याच हॉटेलमध्ये राहून देखील त्या क्वचितच त्या हॉटेलचं जेवण खात असे. त्यांचा स्पॉट बॉय दररोज एका ठिकाणाहून त्यांचा टिफिन आणत असे, ज्यामध्ये मंगळुरू जेवण असायचे. माशांची करी, मसालेदार पदार्थ आणि बरेच काही. पण जेव्हा श्रीदेवी यांना फक्त साधी डाळ आणि वाफवलेला भात हवा असायचा तेव्हा या हॉटेलमधून त्या ऑर्डर करायच्या. त्यांच्या ग्लॅमरमागील साधेपणा तेथील लोकांना नेहमीच आश्चर्यचकित करत असे.
संपूर्ण बॉलिवूड हॉटेलमध्ये होते
हरपाल सिंग पुढे म्हणाले, ‘त्या वेळी संपूर्ण बॉलिवूड आमच्या हॉटेलमध्ये दिसत असे. आम्ही धर्मेंद्रजींच्या मुलाचे लग्न, पुरस्कार सोहळे पाहिले आणि माधुरी दीक्षितच्या कारकिर्दीची भरारीही याच हॉटेलच्या कार्यक्रमांमध्ये पाहिली आहे. श्रीदेवीजी देखील अनेकदा आमच्या चायनीज रेस्टॉरंटमध्ये येत असत. खरे सांगायचे तर, त्या वेळी आमचे हॉटेल स्टार्सचे केंद्र बनले होते.’ असं म्हणत त्यांनी जुन्या आठवणी ताज्या केल्या.
अमिताभ बच्चन यांची सवयही सांगितली
एवढेच नाही तर हरपालने अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित देखील एक मजेदार किस्सा सांगितला. ते म्हणाले, ‘जेव्हा जेव्हा अमिताभ जी त्यांच्या कुटुंबासोबत जया जी, अभिषेक आणि श्वेता यांच्यासोबत यायचे तेव्हा ते जेवताना खूप काळजी घ्यायचे. अभिषेकच्या ताटात काही अन्न शिल्लक राहिले तर बिग बी लगेच त्याला फटकारायचे आणि अभिषेकला ताटात उरलेले अन्न देखील सगळं संपवायला सांगायचे.’
