AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Stranger Things 5: ‘स्ट्रेंजर थिंग्स 5’च्या फिनालेचा धुमाकूळ; शेवटच्या एपिसोडमध्ये नेटफ्लिक्सच क्रॅश!

Stranger Things 5 Finale Episode: 'स्ट्रेंजर थिंग्स 5'चा फिनाले एपिसोड 'द राइटसाइड अप' हा 2026 या नवीन वर्षात स्ट्रीम होताच तुफान चर्चेत आला. परंतु नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे प्रेक्षकांची मोठी नाराजी झाली. फिनालेच्या एपिसोडमध्येच हा प्लॅटफॉर्म क्रॅश झाला.

Stranger Things 5: 'स्ट्रेंजर थिंग्स 5'च्या फिनालेचा धुमाकूळ; शेवटच्या एपिसोडमध्ये नेटफ्लिक्सच क्रॅश!
stranger things 5 finale episodeImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 02, 2026 | 11:03 AM
Share

Stranger Things 5 Finale Episode: नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सुपरहिट वेब सीरिज ‘स्ट्रेंजर थिंग्स 5’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 2026 या नवीन वर्षानिमित्त या सीरिजचा बहुप्रतिक्षित आठवा आणि शेवटचा एपिसोड स्ट्रीम करण्यात आला. ‘द राइटसाइड अप’ या एपिसोडचं नाव आहे. जगभरातील प्रेक्षक या शेवटच्या एपिसोडची प्रतीक्षा करत होते. अखेर जेव्हा हा एपिसोड नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला, तेव्हा सर्वांची प्रचंड नाराजी झाली. कारण या एपिसोडमध्ये नेटफ्लिक्सच क्रॅश झाला. फिनाले एपिसोड स्ट्रीम होताच जगभरातील असंख्य प्रेक्षकांनी नेटफ्लिक्सवर धाव घेतली होती. तेव्हा अचानक हा ओटीटी प्लॅटफॉर्म क्रॅश झाला आणि समस्येनं चाहत्यांना निराश केलं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही तांत्रिक बिघाड सुमारे एक मिनिटभर चालली. यादरम्यान युजर्सना त्यांच्या स्क्रीनवर एक मेसेज मिळाला. या मेसेजवर लिहिलं होतं, ‘काहीतरी चुकलंय. माफ करा. तुमची विनंती पूर्ण करण्यात आम्हाला अडचण येत आहे. तोवर तुम्ही होम पेजवरील इतर पर्याय पाहू शकता.’ यानंतर थोड्या वेळानंतर ही समस्या सोडवण्यात आली असली तरी सोशल मीडियावर प्रेक्षकांचा राग स्पष्ट दिसत होता. अनेकांनी स्क्रीनशॉट शेअर करत नेटफ्लिक्सवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तर काहींनी त्यावरून मीम्स व्हायरल केले. यामुळे हा मुद्दा सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये होता. ही परिस्थिती हाताळण्यासाठी वेब सीरिजच्या निर्मात्यांना आणि नेटफ्लिक्सला प्रेक्षकांची माफी मागावी लागली.

‘अपेक्षेप्रमाणे स्ट्रेंजर थिंग्स 5 च्या फिनाले एपिसोडमध्ये नेटफ्लिक्स क्रॅश झाला’, असं एकाने लिहिलं. तर ‘प्रचंड उत्सुकता निराशेत कशी बदलायची हे नेटफ्लिक्सकडून शिकायला हवं’, असं दुसऱ्याने म्हटलं. कारण अशा पद्धतीने नेटफ्लिक्स क्रॅश होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी जुलै 2022 मध्ये ‘स्ट्रेंजर थिंग्स 4’च्या शेवटच्या भागातही अशीच समस्या उद्भवली होती. तरीही त्यानंतर सीरिजला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता.

‘वॉल्युम 2’मध्ये दाखवण्यात आल होतं की वेक्ना आपलं ध्येय साध्य करण्यासाठी कमकुवत मुलांचा वापर करतो. आता शेवटच्या भागात वेक्ना कसा मरतो आणि त्यानंतर पुढे काय होतं, हे दाखवण्यात आलं आहे. हेन्सी, ज्याला वेक्ना म्हणूनही ओळखलं जातं, त्याचं शेवटच्या एपिसोडमध्ये ज्या पद्धतीने चित्रण केलं, त्यावर काही चाहते नाराजसुद्धा आहेत. कारण वेक्नाचा मृत्यू खूप सहजपणे दाखवण्यात आला होता. ज्यामध्ये त्याला गोळीबाराने आणि बंदुकीने मारण्यात आलं होतं. हा शेवट निराशाजनक असल्याचं काहींनी म्हटलंय.

अजित पवारांकडून गुंडाना उमेदवारी, खरातांचं नाव पुढं करून दादांची पळवाट
अजित पवारांकडून गुंडाना उमेदवारी, खरातांचं नाव पुढं करून दादांची पळवाट.
उद्धव ठाकरे शिवतीर्थवर, ठाकरे बंधूंचा वचननामा फायनल? कधी होणार जाहीर?
उद्धव ठाकरे शिवतीर्थवर, ठाकरे बंधूंचा वचननामा फायनल? कधी होणार जाहीर?.
मनसेसोबत मोठा गेम? दोन उमेदवार अचानक गायब, नेमकी खेळी काय?
मनसेसोबत मोठा गेम? दोन उमेदवार अचानक गायब, नेमकी खेळी काय?.
शिवसेना उमेदवारानं खरंच प्रतिस्पर्धीचा AB फॉर्म खाल्ला?
शिवसेना उमेदवारानं खरंच प्रतिस्पर्धीचा AB फॉर्म खाल्ला?.
पुण्यात भाजप उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या अन
पुण्यात भाजप उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या अन.
एका उमेदवारानं दुसऱ्या उमेदवाराचा AB फॉर्म खाल्ला, पुण्यात एकच चर्चा
एका उमेदवारानं दुसऱ्या उमेदवाराचा AB फॉर्म खाल्ला, पुण्यात एकच चर्चा.
जेजुरी येथे भंडारा उधळत नववर्षाचे स्वागत, भाविकांकडून खंडोबाचे दर्शन
जेजुरी येथे भंडारा उधळत नववर्षाचे स्वागत, भाविकांकडून खंडोबाचे दर्शन.
मनसेचे 53 उमेदवार थेट राज ठाकरेंच्या भेटीला, पडद्यामागे घडतंय काय?
मनसेचे 53 उमेदवार थेट राज ठाकरेंच्या भेटीला, पडद्यामागे घडतंय काय?.
शिंदे सेनेला निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का, 'स्थानिक' निवडणुकीत आव्हान
शिंदे सेनेला निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का, 'स्थानिक' निवडणुकीत आव्हान.
तितकी मिर्ची बुरखेवाली महापौर बनेल याची का लागली नाही, राणेंचा प्रहार
तितकी मिर्ची बुरखेवाली महापौर बनेल याची का लागली नाही, राणेंचा प्रहार.