गोविंदाच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल पत्नी सुनीताचं मोठं वक्तव्य; “तिला शुगर डॅडीकडून..”
अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा तिच्या बेधडक अंदाजासाठी ओळखली जाते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती गोविंदाच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. या सर्व चर्चांचा मुलांवर वाईट परिणाम झाल्याचंही तिने म्हटलंय.

अभिनेता गोविंदा आणि सुनीता अहुजा यांचं वैवाहिक आयुष्य हे गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय बनला आहे. गोविंदाच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे पत्नी सुनीता त्यांना घटस्फोट देणार असल्याचं म्हटलं जात होतं. इतकंच नव्हे तर सुनीताने कोर्टात घटस्फोटासाठी अर्जसुद्धा दाखल केल्याची माहिती समोर आली होती. आता या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर सुनीताने गोविंदाबद्दल मोठा खुलासा केला आहे. सुनीताने सांगितलं की गोविंदाच्या अफेअरच्या चर्चांमुळे त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलांवर अत्यंत वाईट परिणाम होत आहे. 2025 हे वर्ष त्यांच्यासाठी खूप कठीण गेल्याचं त्यांनी म्हटलंय.
‘मिस मालिनी’ या पॉडकास्ट मुलाखतीत सुनीता तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. ती म्हणाली, “2025 हे वर्ष माझ्यासाठी डिझास्टर होतं. कारण माझं संपूर्ण कुटुंब डिस्टर्ब होतं. मला गोविंदाबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकू येत होत्या. ज्या गोष्टी माझ्या कानावर पडत होत्या, त्यांमुळे अर्थातच मी खुश नव्हते. कारण मी नेहमी एकच गोष्ट म्हणत आले आहे की प्रत्येक गोष्ट करण्याचं एक ठराविक वय असतं. वयाच्या 63 व्या वर्षी या सर्व गोष्टी ऐकायला मिळणं चांगलं नसतं. तेसुद्धा जेव्हा मुलं मोठी झालेली असतात. हे अत्यंत वाईट आहे. माझी मुलं आता मोठी झाली आहेत. त्यांना या सर्वांचा किती त्रास होत असेल. मी त्यांना नेहमीच म्हणत आले की, हे तुमचं वय नाही.”
“पण काय असतं ना, आजकालच्या ज्या तरुण मुली इंडस्ट्रीत स्ट्रगल करण्यासाठी येतात त्यांना शुगर डॅडीची गरज असते. जो त्यांचा खर्च उचलणारा असेल. दिसायला काही खास नसल्या तरी त्यांना हिरोइन बनायचं असतं. अशा लोकांकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवणार? त्या आपल्या जाळ्यात फसवतात आणि मग ब्लॅकमेल करतात. अशा मुली खूप आहेत. पण तुम्ही मूर्ख आहात का? तुम्ही 63 वर्षांचे झाला आहात. तुमचं एक चांगलं कुटुंब आबे, सुंदर पत्नी आहे, दोन मोठी मुलं आहेत. वयाच्या 63 व्या वर्षी तुम्ही हे सर्व नाही करू शकत. तुम्ही ते तरुणवयात केलं, तर एकवेळ मी ठीक आहे असं म्हणेन. तरुण वयात आपण सर्वजण चुका करतो, परंतु या वयात नाही. तुम्ही मुलगी टीनाच्या लग्नाचा विचार करायला हवा, मुलगा यशच्या करिअरविषयी विचार करायला हवा”, अशा शब्दांत ती गोविंदाविषयी व्यक्त झाली.
या मुलाखतीत सुनीताने हेसुद्धा स्पष्ट केलं की जर गोविंदाच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या चर्चा खऱ्या ठरल्या, तर ती कधीच गोविंदाला माफ करणार नाही.
