गोविंदाची पत्नी सुनीताला मिळालं फक्त 4 व्हिडीओमध्येच युट्यूबचे सिल्व्हर बटण; पुतण्या कृष्णाची कमेंटही व्हायरल
गोविंदाच्या पत्नी सुनीता आहुजाच्या यूट्यूब चॅनेलची सध्या फारच चर्चा होताना दिसत आहे. तिने आतापर्यंत फक्त चार व्हिडिओ टाकले असले तरी त्या चार व्हिडीओला चक्क सिल्व्हर प्ले बटन मिळालं. हा आनंद तिने तिच्या चाहत्यांसोबतही शेअर केला आहे. सुनीताचे वैयक्तिक जीवन आणि त्यांचे यूट्यूब चॅनेल हे सध्या चर्चेत आहे.

गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा सध्या काहीना काही कारणाने कायम चर्चेत असतेच असते. सुनीता आणि गोविंदा यांच्यातील वाद, तणाव हे याबद्दल सर्वांनाच माहित आहे. त्यांचे वाद हे घटस्फोटापर्यंत गेल्याचंही सर्वांना माहित आहे. अनेक असे व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. मात्र आता गणेशोत्सवादरम्यान तिने मीडियासमोर त्यांचे नाते मजबूत असून ते कोणामुळेही तुटू शकत नाही असं ठणकावून सांगितलं. त्यामुळे आता त्यांच्यातील वाद हे मिटले असल्याचंही चाहते म्हणतायत.
यूट्यूब चॅनलवर टाकलेल्या 4 व्लॉगला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद
एवढंच नाही तर सुनीता सोशल मीडियावरील तिच्या विधानांमुळे ती नेहमीच चर्चेत असते. सुनीता आता तिचे आयुष्य मोकळेपणाने जगत आहे आणि त्याचा खूप आनंद घेताना दिसत आहे. तिने अलीकडेच तिचे यूट्यूब चॅनलही सुरु केले आहे ज्यामध्ये ती चाहत्यांसह तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे करताना दिसते. सुनीता तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी ती शेअर करत असते. तिने यूट्यूब चॅनलवर आतापर्यंत 4 व्लॉग टाकले आहेत. पण या व्हिडीओला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
चार व्लॉगमध्ये सिल्व्हर बटण मिळाले
चाहत्यांनी तिच्या व्हिडीओला, तिच्या चॅनलला इतके प्रेम दिले की सुनीताला फक्त चार व्लॉगमध्ये सिल्व्हर बटण मिळाले आहे. तिने ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिने जेव्हा ही गुडन्यूज सोशल मीडियावर शेअर केली तेव्हा नेटकऱ्यांनी तिचं अभिनंदन केलं. तिचं अभिनंदन करण्यामध्ये पुतण्या कृष्णा देखील होता. त्याने देखील मामीचे अभिनंदन केले आहे.
View this post on Instagram
कृष्णाची कमेंट व्हायरल
सुनीता आहुजाच्या पोस्टवर कमेंट करून कृष्णाने लिहिले ‘अभिनंदन’ लिहून हार्ट इमोजी देखील पोस्ट केली आहे. सुनीताने देखील कृष्णाच्या कमेंटला उत्तर देत लिहिले आहे की , ‘धन्यवाद बेटा’. आता कृष्णाची कमेंट आणि सुनीताचे त्यावरील उत्तर व्हायरल होत आहे.
हातात सिल्व्हर बटण घेऊन सुनीताने आनंद व्यक्त केला आहे
दरम्यान सुनीता आहुजाने तिच्या चाहत्यांसोबत तिला सिल्व्हर बटण मिळाल्याचा आनंद शेअर केला आहे. हातात सिल्व्हर बटण घेऊन मजा करताना तिने बरेच फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. ही पोस्ट शेअर करताना तिने लिहिले आहे ‘माझ्या यूट्यूब चॅनेलसाठी सिल्व्हर बटण दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. मला असेच सर्वांचे प्रेम हवे आहे”. सुनीताच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. सर्वजण तिचे अभिनंदन करत आहेत.
