AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunny Deol | सनी देओलने केली बॉलिवूड इंडस्ट्रीची पोलखोल; म्हणाला “..ते सर्व बनावटी”

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने बॉलिवूडमधील गट आणि इंडस्ट्रीतील लोकांचा दिखाऊ स्वभाव यांवर भाष्य केलं. "फिल्मी कुटुंबातून येऊनसुद्घा मी कोणत्याच गटाचा भाग नव्हतो आणि आमचं कुटुंबसुद्धा कधीच गटबाजीत सहभागी नव्हती", असं त्याने स्पष्ट केलं.

Sunny Deol | सनी देओलने केली बॉलिवूड इंडस्ट्रीची पोलखोल; म्हणाला ..ते सर्व बनावटी
Sunny Deol Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 09, 2023 | 10:48 AM
Share

मुंबई | 9 ऑगस्ट 2023 : अभिनेता सनी देओल लवकरच ‘गदर 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल 22 वर्षांनंतर ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा हा सीक्वेल प्रदर्शित होतोय. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण टीमकडून चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं जातंय. या मुलाखतींमध्ये सनी देओल विविध मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने बॉलिवूडमधील गट आणि इंडस्ट्रीतील लोकांचा दिखाऊ स्वभाव यांवर भाष्य केलं. “फिल्मी कुटुंबातून येऊनसुद्घा मी कोणत्याच गटाचा भाग नव्हतो आणि आमचं कुटुंबसुद्धा कधीच गटबाजीत सहभागी नव्हती”, असं त्याने स्पष्ट केलं.

पूजा तलवारला दिलेल्या मुलाखतीत सनीने सांगितलं की 1990 च्या काळात जेव्हा त्याला भाऊ बॉबीला इंडस्ट्रीत लाँच करायचं होतं, तेव्हा तो अनेक दिग्दर्शकांशी बोलला. मात्र काही कारणास्तव त्याला लाँच करण्यासाठी कोणीच तयार नव्हतं. “मला आठवतंय बॉबीला लाँच करण्यासाठी मी अनेक दिग्दर्शकांची भेट घेतली होती. मात्र एकही व्यक्ती आमच्यासोबत काम करण्यास तयार नव्हती.” बॉबी देओलने 1995 मध्ये ‘बरसात’ या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. राजकुमार संतोषी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यावेळी राजकुमार आणि सनी देओल हे अत्यंत जवळचे सहयोगी होते. दोघांनी घायल आणि दामिनी यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं.

इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांच्या दिखाऊ स्वभावाबद्दल सनी पुढे म्हणाला, “इंडस्ट्रीत प्रत्येकजण तुम्हाला मिठी मारतो आणि तुमच्यावर खूप प्रेम असल्यासारखं भेट घेतो पण हे सर्व बनावटी असतं. बरेचजण मला पाजी म्हणतात, पण मी त्यांना म्हणतो की मला पाजी बोलू नका. कारण तुम्हाला पाजी या शब्दाचा अर्थ माहीत नाही. त्या शब्दात मोठ्या भावासाठी खूप आदर असतो. सध्या बऱ्याच गोष्टी घडत आहे आणि भविष्यातही घडत राहतील. कारण ते खऱ्या आयुष्यात खूप चांगले अभिनेते आहेत, मात्र ऑनस्क्रीन नाहीत.” याच मुलाखतीत सनीने सांगितलं की तो बॉलिवूडमधल्या कोणत्याच गटाचा भाग नाही.

‘गदर 2’ या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्येही फार उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘गदर 2’ची जोरदार ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा होत आहे. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेमकथा’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. यामध्ये भारतातील तरुण आणि पाकिस्तानची तरुणी यांच्यातील प्रेम कहाणी दाखवण्यात आली होती. आता त्याचीच पुढील कथा सीक्वेलमध्ये मांडण्यात येणार आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.