Border 2 Box Office Collection ‘बॉर्डर 2’ ला पाचव्या दिवशी मोठा झटका
Border 2 Box Office Collection: अभिनेता सनी देओल स्टारर 'बॉर्डर 2' सिनेमाने एखाद्या एक्स्प्रेस प्रमाणे सुरुवात केली. पण पाचव्या दिवशी सिनेमाला मोठा धक्का बसला आहे. झटक्यात 65% प्रेक्षकांनी सिनेमाकडे पाठ फिरवली आहे...

Border 2 Box Office Collection: अभिनेता सनी देओल स्टारर ‘बॉर्डर 2’ सिनेमा 23 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. सिनेमात सनी देओल यांच्यासोबत अनेक स्टार देखील आहे. सिनेमाने पहिला चार दिवशी एखाद्या एक्स्प्रेस प्रमाणे कमाई केली. पण पाचव्या दिवशी ‘बॉर्डर 2’ सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावला आहे. पाचव्या दिवशी ‘बॉर्डर 2’ सिनेमाच्या कमाईचा वेग 65% मंदावला आहे. पहिले चार दिवस ‘बॉर्डर 2’ सिनेमासाठी खास ठरले. शनिवार, रविवार आणि सोमवारी देखील सुट्टी असल्यामुळे विशेषतः सनी देओल याला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात मोठी गर्दी केली. पण मंगळवारी सिनेमाला 20 कोटी रुपयांचा आकडा देखील गाठता आलं नाही. असं असताना देखील सिनेमा देशात 200 कोटीची कमाई केली आहे.
दिग्दर्शक अनुराग सिंग दिग्दर्शित ‘बॉर्डर 2’ सिनेमाची कथा 1971 मध्ये झालेल्या भारत – पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. 275 बजेट असलेला ‘बॉर्डर 2’ सिनेमा देशभरात तब्बल 4 हजार 800 स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाला अवघ्या तीन दिवसांत 52.65 लाखांहून अधिक प्रेक्षक मिळाले आहेत आणि ही वाढ BookMyShow सारख्या प्लॅटफॉर्मवर स्पष्टपणे दिसून येते, जिथे प्रति तास तिकीट विक्रीत झपाट्याने वाढ झाली आहे.
‘बॉर्डर 2’ कलेक्शन डे 5
रिपोर्टनुसार, ‘बॉर्डर 2’ सिनेमाने पहिल्या मंगळवारी म्हणजे पाचव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर फक्त 19.50 कोटींची कमाई केली आहे. तर 26 जानेवारी रोजी सिनेमाने 59 कोटींची कमाई केली. ‘बॉर्डर 2’ सिनेमाने ओपनिंग डेला 30 कोटी तर, दुसऱ्या दिवशी 36.5 कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी सिनेमाने 54.5 कोटींपर्यंत मजल मारली. पाचव्या दिवशी, सिनेमाची कमाई घसरली आणि देशभरात फक्त 196.50 कोटींची कमाई सिनेमाने केली आहे.
‘बॉर्डर 2’ चा वीकेंड खूप छान गेला आणि सोमवारी, राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही, सिनेमाने मोठी कमाई केली. खरी परीक्षा पहिल्या दिवशी होती आणि ‘बॉर्डर 2’ ने त्यातही उत्तम कामगिरी केली. आता येत्या काही दिवसांमध्ये सनी देओल स्टारर ‘बॉर्डर 2’ सिनेमा किती कोटींची कमाई करणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सनी देओल स्टारर ‘बॉर्डर 3’
बॉर्डर – 2 च्या मोठ्या यशानंतर चित्रपट दिग्दर्शक भूषण कुमार यांनी ‘बॉर्डर 3 देखील कन्फर्म केला आहे. हा सिनेमा येण्यासाठी बराच काळ लागणार आहे. पण आता ‘बॉर्डर 3’ सिनेमासाठी देखील प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर ‘गदर 3’ सिनेमाची चर्चा देखील सुरु आहे.
