सनी लिओनीने मुलांच्या सरोगेट आईला दिली तगडी रक्कम; पैशांतून तिने घेतलं घर, धूमधडाक्यात केलं लग्न
अभिनेत्री सनी लिओनीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या जुळ्या मुलांच्या सरोगेट आईला दिलेल्या रकमेचा खुलासा केला. सनीने इतकी मोठी रक्कम दिली होती की त्यातून त्या सरोगेट आईने स्वत:चं घर विकत घेतलं आणि धूमधडाक्यात लग्नही केलं.

अभिनेत्री सनी लिओनीला तीन मुलं आहेत. त्यापैकी मुलगी निशाला तिने दत्तक घेतलंय, तर सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांचा जन्म झाला. नूह आणि अशर अशी तिच्या मुलांची नावं आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनी पहिल्यांदाच तिच्या सरोगसीच्या अनुभवाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. तिने सरोगेट आईला दिलेल्या भरभक्कम रकमेचाही खुलासा केला. त्या रकमेतून सरोगेट आई स्वत:साठी हक्काचं घर घेऊ शकली आणि लग्नाचाही खर्च उचलू शकली, असं सनीने सांगितलं आहे. ‘ऑल अबाऊट हर’ या पॉडकास्ट मुलाखतीत ती अभिनेत्री सोहा अली खानसोबत सरोगसीवर बोलत होती. या एपिसोडच्या ट्रेलरला सोहाने गुरुवारी पोस्ट केला असून सनी त्यामध्ये तिच्या खासगी आयुष्याविषयी व्यक्त झाली.
या व्हिडीओच्या सुरुवातीला सोहा अली खान म्हणते, “आजचा एपिसोड खऱ्या अर्थाने आई-वडील होण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींबद्दल जाणून घेण्याचा आहे.” त्यानंतर सनी म्हणते, “माझ्या मनता एक विचार आला की मला एका मुलीला दत्तक घ्यायचं आहे.” भारतातील स्त्री-रोग तज्ज्ञांपैकी एक किरण कोएलोसुद्धा महिलांच्या स्वास्थ्याबद्दल बोलण्यासाठी या पॉडकास्टमध्ये सहभागी होते.
View this post on Instagram
ट्रेलमरध्ये सनी मुलीला दत्तक घेण्याच्या प्रवासाबद्दल सांगते, “बाळाला दत्तक घेण्यासाठी आम्ही एक अर्ज दिला होता आणि ज्या दिवशी आयव्हीएफ झाला, त्याच दिवशी आम्हाला एक मुलगी भेटली.” या चर्चेदरम्यान सोहाने सनीला विचारलं की आई व्हायचं नव्हतं म्हणून तिने सरोगसीचा निर्णय जाणूनबुजून घेतला होता का? त्यावर सनीने होकारार्थी उत्तर दिलं. त्यानंतर सोहाने सरोगसीच्या खर्चाबाबत प्रश्न विचारला. “आम्ही दर आठवड्याला सरोगेट आईला फी द्यायचो. तिच्या पतीलाही सुट्टी घेण्यासाठी पैसे देत होतो. तिला सरोगसीचेही पैसे मिळाले होते. म्हणजेच एकंदर आम्ही तिला खूप पैसे दिले आहेत. त्यातून तिने स्वत:चं घर खरेदी केलं आणि धूमधडाक्यात लग्नसुद्धा केलं”, असं सनी पुढे सांगते.
सनी लिओनीने 2011 मध्ये डॅनियल वेबरशी लग्न केलं होतं. या दोघांना तीन मुलं आहेत. 2017 मध्ये तिने महाराष्ट्रातून निशा या मुलीला दत्तक घेतलं. त्यानंतर 2018 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून नूह आणि अशर या जुळ्या मुलांचा जन्म झाला. सनीच्या सोशल मीडियावर तिच्या मुलांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पहायला मिळतात.
