Sushant Singh Rajpoot Suicide | सुशांतच्या आत्महत्येबाबत पोलिसांचा उलटा तपास, सुशांतच्या बहिणीला पुन्हा जबाबासाठी बोलावले

आता एक महिन्यानंतर पुन्हा पोलिसांनी सुशांतच्या नातेवाईकांना जबाब नोंदवण्यासाठी बोलवायला सुरुवात केली आहे

Sushant Singh Rajpoot Suicide | सुशांतच्या आत्महत्येबाबत पोलिसांचा उलटा तपास, सुशांतच्या बहिणीला पुन्हा जबाबासाठी बोलावले

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात (Sushant Singh Rajpoot Suicide Case Investigation) पोलिसांचा उलटा तपास सुरु झाला आहे. सुशांतने 14 जून रोजी आत्महत्या केली होती. त्या दिवशी पोलिसांनी सुशांतचे वडील आणि इतर नातेवाईक यांना कुणावर संशय आहे का, असं विचारलं होतं. त्यांचा जबाब नोंदवला होता. मात्र, आता एक महिन्यानंतर पुन्हा पोलिसांनी सुशांतच्या नातेवाईकांना जबाब नोंदवण्यासाठी बोलवायला सुरुवात केली आहे (Sushant Singh Rajpoot Suicide Case Investigation).

अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून 2020 रोजी आत्महत्या केली होती. सुशांत खूप हुशार होता. त्याला कोणताही आजार, त्रास नव्हता. तो खूप ध्येयवादी होता. तो आत्महत्या करुच शकत नाही. अशा प्रतिक्रिया त्यावेळी येत होत्या. पोलिसांनीही त्याची दखल घेऊन आत्महत्येच प्रकरण नोंदवून तपास सुरु केला. सुशांतच्या हातातून सात चित्रपट काढून घेण्यात आले होते. यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला होता, असं म्हटलं जात होतं. त्यामुळे आत्महत्येचं प्रकरण असतानाही पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्येसाठी कुणी जबाबदार आहे का, याचा तपास सुरु केला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

सुरुवातीला पोलिसांनी सुशांतचे वडील, दोन बहिणी, नोकर मंडळी, जवळचे मित्र, मैत्रिणी यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं. त्यानंतर सुशांत याच्याशी संबंधित चित्रपटातील मोठ- मोठ्या व्यक्तींना जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं (Sushant Singh Rajpoot Suicide Case Investigation).

गेल्या महिन्याभरात तब्बल 35 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. एवढे जबाब नोंदवल्यानंतर त्याचप्रमाणे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, रेश्मा शेट्टी ,आशु शर्मा आदी बड्या लोकांचे जबाब नोंदवल्यानंतर पोलीस महत्वाच्या मुद्यापर्यंत पोहचले असतील, असं वाटत होतं. मात्र, तस काहीच झालं नाही.

पोलिसांनी आता ज्यांचे आधी जबाब घेतले होते. त्यांचे पुन्हा जबाब घ्यायला सुरुवात केली आहे. सुशांत याची बहीण मीतूला आज जबाबासाठी बोलावलं होतं. मात्र, ती आज येऊ शकली नाही. ती उद्या येण्याची श्यक्यता आहे. तर सुशांतचं जेवण बनवणारा नोकर नीरज याचा नुकताच जबाब घेण्यात आला.

Sushant Singh Rajpoot Suicide Case Investigation

संबंधित बातम्या :

Sushant Singh Rajput Case | आधी 30 जणांचे खुले जबाब, आता मात्र पोलिसांकडून छुपी चौकशी

Sushant Singh Rajput | दिग्दर्शक शेखर कपूर यांचा मुंबई पोलिसांना धक्कादायक ई-मेल

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *