मध्यरात्रीच इथे काही तरी घडतं… प्रत्येक रात्र भीतीदायक; 2 तासांचा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा पाहून भरेल धडकी
2 तासांचा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा पाहून भरेल धडकी... शेवटच्या 20 मिनिटांत उलगडलेली कथा इतकी गुंतागुंतीची होते की तुम्ही नक्कीच विचारणार की 'पुढे काय होईल...'

रविवार आहे त्यामुळे आज कोणता खास प्लान आहे. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जात आहेत की, घरात बसून पावसाचा आनंद घेणार आहात? जर पावसाळ्यात कुटुंबासोबत खास क्षण व्यतीत करत असाल तर, ओटीटीवर सस्पेंस थ्रिलर सिनेमा नक्की पाहा… ओटीटी प्लॅटफॉर्मवर सस्पेंस थ्रिलर सिनेमा प्रदर्शित झाला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही हैराण व्हाल… या सिनेमामुळे तुमचा रविवार देखील खास होईल…
2 तास 2 मिनिटांचा हा सिनेमा ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. कथा सुरू झाल्यानंतर 10 मिनिटांनी, तुम्हाला पुढे काय होईल असा प्रश्न पडेल. फक्त 5 कोटींमध्ये बनवलेल्या या सिनेमाच्या शेवटच्या सीनपर्यंत चाहत्यांना टीव्हीसमोर बसावे लागेल. शेवटच्या 20 मिनिटांत उलगडलेली कथा इतकी गुंतागुंतीची होते की तुम्ही नक्कीच विचारणार की ‘पुढे काय होईल…’
सिनेमाचं नाव ‘रोंथ’ आहे. सिनेमाची निर्मिती विनीत जैन, रतीश, रेंजिथ ईवीएम, जोजो जोस यांनी केलं आहे. हा एक मल्याळम क्राइम थ्रिलर आहे, जो ओटीटीवर हिंदीमध्ये देखील उपलब्ध आहे. ‘रोंथ’ म्हणजे पेट्रोलिंग. ‘रोंथ’ एक क्राइम थ्रिलर सिनेमा आहे ज्याची कथा एका रात्रीच्या घटनांवर आधारित आहे.
सस्पेन्सफुल कथा, सतत घडणाऱ्या घटना आणि शेवटी येणारे ट्विस्ट हे सिनेमाचे प्रमुख बलस्थान आहेत. रात्रीचे दृश्ये सुंदरपणे चित्रित करण्यात आली आहेत. अनिल जॉन्सनचे पार्श्वसंगीत सिनेमाचा थरार आणखी वाढवते. ‘रोंथ’ हा सिनेमा आठवड्याच्या शेवटी ओटीटीवर पाहण्यासाठी एक उत्तम सिनेमा आहे.
रोंथ सिनेमा हॉटस्टार ओटीटीवर उपलब्ध आहे. आयएमबीडीने सिनेमाला 7.4 रेटिंग दिलं आहे. लेखक आणि दिग्दर्शक शाही कबीर यांचा हा सिनेमा गेल्या महिन्यात 13 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. सुमारे 5 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या मल्याळम सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 9 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा सुरु आहे.
