स्वरा भास्करची पतीने सर्वांसमोर उडवली खिल्ली; म्हणाला ‘दिसायला ही तर..’
अभिनेत्री स्वरा भास्कर आणि तिचा पती फहाद अहमद हे 'पती पत्नी और पंगा 2' या शोमध्ये सहभागी झाले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये फहादने सर्वांसमोर स्वराच्या दिसण्याची खिल्ली उडवली आहे.

‘पती पत्नी और पंगा’ या रिॲलिटी शोचा दुसरा सिझन सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यामध्ये फिल्म आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील काही रिअल-लाइफ जोड्या सहभागी झाल्या आहेत. त्यापैकीच एक आहे अभिनेत्री स्वरा भास्कर आणि तिचा पती फहाद अहमद. कलर्स टीव्हीकडून नुकताच आगामी एपिसोडचा प्रोमो शेअर करण्यात आला. हा प्रोमो पाहून तुम्हीसुद्धा चकीत व्हाल. कारण फहाद आणि स्वरा यांच्यातील संवाद एकीकडे तुम्हाला हसवणारही आणि त्याचसोबत आश्चर्याचा धक्काही देणार. या दोघांमधील तू तू – मैं मैं व्हायरल होत आहे.
फहाद म्हणतो, “माझ्याकडे स्वरापेक्षा जास्त अक्कल आहे. दिसायला तर आम्ही दोघं एकसारखेच आहोत, फक्त 19-20 चा फरक आहे.” हे ऐकल्यानंतर स्वराच्या चेहऱ्यावरील हावभाव बघण्यासारखे असतात. स्वरा म्हणते, “हे ऐकून मला आश्चर्य वाटतंय की या माणसाला त्याचा आणि माझा चेहरा एकसारखा वाटतोय. मला तो हॉट वाटतो, पण त्याला स्वत:लाच ती गोष्ट माहीत नाही.” स्वराला प्रत्युत्तर देताना फहाद म्हणतो, “तू तर म्हणतेस की आपण दोघं एकसारखे आहोत, दोघं भाऊ-भाऊ.” त्याला नेमकं काय म्हणायचं आहे, हेच स्वराला समजत नाही. या दोघांमधील हा संवाद सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
View this post on Instagram
स्वरा आणि फहादने 2023 मध्ये लग्न केलं. लग्नाच्या सहा महिन्यांतच स्वराने मुलीला जन्म दिला. पत्नी आणि आईच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तिने कामातून मोठा ब्रेक घेतला. त्यानंतर तिने ‘पती पत्नी और पंगा 2’ या शोमध्ये भाग घेतला. परंतु चित्रपटांमध्ये काम करण्याचा इतक्यात विचार नसल्याचं स्वराने एका मुलाखतीत स्पष्ट केलं. “मला माझं घर सोडून जायचं नाहीये. माझ्यासाठी हा एक शो करणंसुद्धा खूप कठीण होतं. बऱ्याच विचारविनिमयानंतर मी या शोसाठी होकार दिला होता. शूटिंगदरम्यानही मी इतर अनेक गोष्टी सांभाळत असते,” असं ती म्हणाली होती.
स्वरा भास्कर चित्रपटांपेक्षा तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहते. स्वराने राजकारणी फहाद अहमदशी कोर्टात स्पेशल मॅरेज ॲक्टअंतर्गत लग्न केलं. या दोघांचे धर्म वेगवेगळे आहेत. फहाद मुस्लीम तर स्वरा हिंदू आहे. एका रॅलीदरम्यान दोघांची पहिली भेट झाली होती.
