AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेजश्री प्रधानच्या जागी नव्या अभिनेत्रीला पाहून नेटकरी नाराज; म्हणाले ‘शोभून दिसत नाहीत..’

अभिनेत्री तेजश्री प्रधानने 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेचा निरोप घेतला. त्यानंतर नव्या अभिनेत्रीने तेजश्रीची जागा घेतली आहे. मात्र ही नवी मुक्ता प्रेक्षकांना विशेष आवडली नसल्याचं दिसून येत आहे. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

तेजश्री प्रधानच्या जागी नव्या अभिनेत्रीला पाहून नेटकरी नाराज; म्हणाले 'शोभून दिसत नाहीत..'
तेजश्री प्रधान, स्वरदा ठिगळे आणि राज हंचनाळेImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 15, 2025 | 12:45 PM
Share

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधानने काही दिवसांपूर्वीच मालिकेचा निरोप घेतला. त्यानंतर आता या मालिकेत नव्या मुक्ताची एण्ट्री झाली आहे. तेजश्रीनंतर यामध्ये मुक्ताची भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. अखेर मकर संक्रांतीच्या निमित्ताने नवी मुक्ता प्रेक्षकांसमोर आली. अभिनेत्री स्वरदा ठिगळेनं मालिकेत तेजश्रीची जागा घेतली आहे. स्टार प्रवाहच्या मकर संक्रांती विशेष कार्यक्रमात सागर (राज हंचनाळे) आणि नवी मुक्ता (स्वरदा) पहिल्यांदा एकत्र दिसले. या दोघांची जोडी पाहून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेच्या निमित्ताने तेजश्रीने बऱ्याच वर्षांनंतर छोट्या पडद्यावर काम केलं होतं. यात तिने साकारलेली मुक्ताची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. सागरसोबतची तिची जोडीसुद्धा हिट ठरली होती. मात्र काही कारणास्तव तिने ही मालिका मध्येच सोडली. यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली. म्हणून तेजश्रीच्या जागी नव्या अभिनेत्रीला पाहून काही नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘तेजश्री प्रधान नाही तर मालिका खास नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘हे दोघं एकमेकांना शोभून दिसत नाहीत’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘तेजश्रीच छान होती पण नवीन कलाकारांचंही स्वागत केलं पाहिजे’, असंही काहींनी लिहिलं आहे.

तेजश्रीने अचानक मालिका का सोडली याचं नेमकं कारण समोर आलं नाही. मात्र मालिका सोडल्यानंतर तेजश्रीने लिहिलेल्या एका सोशल मीडियावरील पोस्टची नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा झाली. ‘चिअर्स.. कधीकधी तुम्हाला बाहेर पडावं लागतं. तुमचं महत्त्व जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्त्वाचा आदर करा. कारण तुमच्यासाठी ते इतर कोणीही करणार नाही’, असं तिने त्यात लिहिलं होतं. त्याचसोबत ‘तुम्ही ज्याचे पात्र आहात त्यापेक्षा कमी गोष्टींसाठी अजिबात तडजोड करू नका’, ‘तुम्ही महत्त्वाचे आहात’, ‘देवाकडे तुमच्यासाठी नेहमीच प्लॅन तयार असतो’, ‘हॅपी लाइफ’ असे हॅशटॅग तिने दिले होते. मालिकेतून बाहेर पडल्यानंतर तेजश्रीने ही पोस्ट लिहिल्याने त्यावरून नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली होती.

मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.