AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तापसी पन्नूने गुपचूप उरकलं लग्न? प्रसिद्ध दिग्दर्शकाची खास पाहुणा म्हणून हजेरी… चर्चांना उधाण

Taapsee Pannu Wedding : तापसी पन्नू हिने परदेशी बॉयफ्रेंडसोबत गुपचूप उरकलं लग्न? बॉलिवूडच्या ठराविक सेलिब्रिटींनी लावली हजेरी... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तापसी पन्नू हिच्या लग्नाची चर्चा... गेल्या अनेक दिवसांपासून रंगतेय तापसी पन्नू हिच्या लग्नाची चर्चा...

तापसी पन्नूने गुपचूप उरकलं लग्न?  प्रसिद्ध दिग्दर्शकाची खास पाहुणा म्हणून हजेरी... चर्चांना उधाण
| Updated on: Mar 25, 2024 | 1:33 PM
Share

फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, सर्वत्र लग्नाचे वारे वाहात आहेत. अभिनेत्री रकुल प्रित सिंग आणि जॅकी भगनानी यांच्यानंतर अभिनेत्री तापसी पन्नू विवाहबंधनात अडकल्याची माहिती समोर येत आहे. रिपोर्टनुसार, तापसीने बॉयफ्रेंड मॅथियास बोई याच्यासोबत लग्न केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तापसी आणि बॉयफ्रेंड मॅथियास बोई यांनी 23 मार्च रोजी लग्न केलं आहे. उदयपूर याठिकाणी तापसी आणि बॉयफ्रेंड मॅथियास यांचा विवाह संपन्न झाल्याची माहिती समोर आली आहे. तापसी पन्नू आणि माजी ऑलिम्पिक पदक विजेता मॅथियास बो यांनी कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘लग्न उदयपूरमध्ये याठिकाणी झालं असून, विवाह सोहळ अत्यंत गुपित ठेवण्यात आला होता. प्री-वेडिंग कार्यक्रमांची सुरुवात 20 मार्चपासून झाली.’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तापसी पन्नू आणि माजी ऑलिम्पिक पदक विजेता मॅथियास बो यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटांना नव्हतं निमंत्रण

तापसी पन्नूच्या लग्नाला बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटींना आमंत्रित केलं नव्हतं. अभिनेत्रीने इंडस्ट्रीतील फक्त तिच्या जवळच्या मित्रांना, अनुराग कश्यप आणि कनिका ढिल्लों यांनी आमंत्रित केले होते. अनुराग कश्यप आणि तापसी यांच्या ओळखीबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमांसाठी दोघे एकत्र आले होते. दिग्गज दिग्दर्शकाने अभिनेत्रीच्या ‘मनमर्जियां’ आणि ‘दोबारा’ या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.

कुठे राहतो तापसी हिया बॉयफ्रेंड मॅथियास?

मॅथियास बोई हा डेन्मार्कचा रहिवासी आहे. बॅडमिंटनपटू म्हणून तो ऑलिम्पिक पदक विजेता आणि युरोपियन चॅम्पियन आहे. मात्र, 2020 मध्ये तो निवृत्त झाला. बॅडमिंटन विश्वात तापसीच्या बॉयफ्रेंडचं नाव फार मोठं आहे. सोशल मीडियावर मॅथियासचे फोटो देखील व्हायरल होत असतात.

तापसी हिच्या बॉलिवूड करियरबद्दल सांगायचं झालं तर, 2013 पासून तापसी बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. ‘चश्मे बद्दूर’ हा तापसीची पहिला सिनेमा आहे. नुकताच तापसी अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत ‘डिंकी’ सिनेमात दिलसली होती. सिनेमा 2023 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 450 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली होती.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा