AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तारक मेहता..’मध्ये बळजबरी तोकडे कपडे घालायला दिले..; अभिनेत्रीला अश्रू अनावर

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत झळकलेल्या अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. या मालिकेत तिला तोकडे कपडे घालण्यास भाग पाडल्याच आरोप तिने केला आहे.

'तारक मेहता..'मध्ये बळजबरी तोकडे कपडे घालायला दिले..; अभिनेत्रीला अश्रू अनावर
तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकाImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 01, 2026 | 10:41 AM
Share

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ आणि ‘गंदी बात’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलेली अभिनेत्री नेहल वडोलिया सध्या तिच्या एका पॉडकास्ट मुलाखतीमुळे चर्चेत आहे. या मुलाखतीत तिने तिच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले आहेत. ‘तारक मेहता..’ या मालिकेबद्दल एक धक्कादायक खुलासा करताना नेहलला अश्रू अनावर झाले. मालिकेच्या एका एपिसोडमध्ये तोकडे कपडे घालण्यास भाग पाडल्याचा खुलासा तिने केला. त्या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल नसतानाही तिला सांगण्यात आलं की, मुख्य अभिनेत्रीने सांगितलं की ड्रेस परिधान करावाच लागेल. नेहलने आता मालिकांमध्ये काम करणं बंद केलं आहे. ‘तारक मेहता..’मध्येच ती शेवटची झळकली होती. या मालिकेत काम करताना अपमानास्पद वागणूक मिळाल्याचाही आरोप तिने केला आहे. नेहलने यामध्ये बबिताच्या मैत्रिणीची छोटी भूमिका साकारली होती.

‘सुनो इंडिया’ या पॉडकास्टमध्ये नेहल म्हणाली, “मी तारक मेहता.. या मालिकेत शेवटचं काम केलं होतं. त्यानंतर मला गंदी बात या शोची ऑफर मिळाली आणि तेव्हापासून मी मालिकेत काम करणं सोडून दिलं. तारक मेहता.. या मालिकेत काम करण्याचा अनुभव चांगला होता. त्यानंतर मला मुख्य भूमिका मिळू लागल्या होत्या. पण ही गोष्ट मी कधीच सांगितली नाही की जर टीव्ही इंडस्ट्रीत तुम्ही कॅमिओ किंवा छोटी भूमिका साकारत असाल, तर तुम्हाला अपमानास्पद वागणूक मिळते. मला घरून माझे आऊटफिट्स आणायला सांगितलं जायचं.”

“मी जेव्हा घरून माझ्यासाठी ड्रेस आणला, तेव्हा मुख्य अभिनेत्रीचाही ड्रेस एकसारखाच होता. आता ती मुख्य अभिनेत्री असल्याने ड्रेस बदलणार नाही. तिने दुसऱ्यांमार्फत मला ड्रेस बदलायला सांगितलं. नंतर मला जो ड्रेस देण्यात आला, त्यात मी कम्फर्टेबल नव्हती. कारण तोपर्यंत मी कोणतेच बोल्ड प्रोजेक्ट केले नव्हते. मी तो ड्रेस घालण्यास नकार दिला, तेव्हा त्या व्यक्तीने सांगितलं की, तुला हाच ड्रेस घालावा लागेल, दुसऱ्या मॅडमने तसं सांगितलं आहे. लहान भूमिका असताना आपण अशा वेळी नकार देऊ शकत नाही”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.

या मुलाखतीत नेहलने असाही खुलासा केला की आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स टीममधील एका घटस्फोटीत क्रिकेटरने तिला सोशल मीडियावर मेसेज केला होता. त्या क्रिकेटरने नेहलच्या स्टोरीवर ‘हॉट, सुंदर आणि प्रेमळ’ अशी कमेंट केल्याचा दावा तिने केला. नेहलने पुढे सांगितलं की तिला हा संवाद वाढवायचा नव्हता म्हणून तिने त्या क्रिकेटरला प्रतिक्रिया दिली नव्हती. नंतर तिने सोशल मीडियावर त्याला ब्लॉक केलं. हा क्रिकेटर कोण होता, याविषयी तिने खुलासा केला नाही.

Follow Us
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मृत्यूचा थरार! कंटेनर-ट्रकची भीषण धडक....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मृत्यूचा थरार! कंटेनर-ट्रकची भीषण धडक.....
जायकवाडी धरणात दुर्दैवी दुर्घटना; पाण्यात बुडून दोन मित्रांचा मृत्यू
जायकवाडी धरणात दुर्दैवी दुर्घटना; पाण्यात बुडून दोन मित्रांचा मृत्यू.
महागाईचा आणखी एक झटका! LPG सिलेंडर पुन्हा महाग, खिशाला कात्री
महागाईचा आणखी एक झटका! LPG सिलेंडर पुन्हा महाग, खिशाला कात्री.
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त.
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या...
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या....
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी...
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी....
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;.
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे.
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह.
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत...
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत....