Dayaben | पती-मुलांसोबत दिसली ‘तारक मेहता..’ची दयाबेन; नेटकरी म्हणाले ‘यांचा परत येण्याचा मूडच नाही’

जेव्हापासून दयाबेन ही मालिका सोडून गेली, तेव्हापासून त्यात ती भूमिका परतलीच नाही. अभिनेत्री दिशा वकानी या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारत होती. आता तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Dayaben | पती-मुलांसोबत दिसली 'तारक मेहता..'ची दयाबेन; नेटकरी म्हणाले 'यांचा परत येण्याचा मूडच नाही'
Disha Vakani
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 1:40 PM

मुंबई: छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय मालिका कोणती, असा प्रश्न विचारला तर बहुतांश प्रेक्षकांकडून ‘तारका मेहता का उल्टा चष्मा’ हेच उत्तर ऐकायला मिळेल. गेल्या बऱ्याच वर्षांपासून ही मालिका आणि त्यातील कलाकार आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत. यातील दयाबेन आणि जेठालाल या जोडीच्या केमिस्ट्रीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. मात्र जेव्हापासून दयाबेन ही मालिका सोडून गेली, तेव्हापासून त्यात ती भूमिका परतलीच नाही. अभिनेत्री दिशा वकानी या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारत होती. आता तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिशाने 2017 मध्ये ही मालिका सोडली होती. बाळंतपणाच्या रजेवर गेलेली दिशा पुन्हा मालिकेत परतलीच नाही. तिला मालिकेत परत आणण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र दिशा सध्या तिच्या खासगी आयुष्यावर लक्ष केंद्रीत करत असल्याचं म्हटलं गेलं. याची प्रचिती आता तिच्या या व्हायरल व्हिडीओवरून येत आहे.

हे सुद्धा वाचा

बऱ्याच दिवसांनंतर दिशाचा हा व्हिडीओ चाहत्यांसमोर आला आहे. कारण सोशल मीडियावर ती फार कमी सक्रिय असते. या व्हिडीओमध्ये दिशा तिचा पती मयूर वकानी आणि दोन मुलांसोबत पहायला मिळतेय. एका मंदिरात कुटुंबीयांसोबत बसून ती पूजा करताना दिसतेय. दिशाच्या मांडीवर तिचा मुलगा बसला आहे आणि मयूरच्या मांडीवर मुलगी बसली आहे.

दिशाच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होतोय. काहींनी तिला मालिकेत परत येण्याची विनंती केली तर काहींनी तिच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘दिशाच्या जागी नवीन अभिनेत्री तरी आणा. तिचा परत येण्याचा कोणताच मूड दिसत नाहीये. तुम्ही का तिच्यावर वेळ वाया घालवत आहात’, असा सवाल एका युजरने ‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांना केला. तर ‘मॅडम हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र किमान माध्यमांसमोर येऊन हे स्पष्ट तरी करा की तुम्ही परत येणार आहात की नाही’, असंही दुसऱ्याने म्हटलंय.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. मात्र गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत झालेल्या काही बदलांमुळे त्याची लोकप्रियता कमी होत असल्याचं पहायला मिळतंय. आतापर्यंत यातील बऱ्याच कलाकारांनी मालिकेचा निरोप घेतला. यात दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी, टप्पूची भूमिका साकारणारा भव्य गांधी आणि राज अनाडकत, तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांचा समावेश होता.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.