‘तारक मेहता…’ फेम दयाबेन हिच्या मुलाची पहिली झलक; गोंडस दिसतो Disha Vakani चा लेक

दयाबेन म्हणजे अभिनेत्री दिशा वकानी आजही चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. पण आता दयाबेन नाही तर तिच्या मुलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे...

'तारक मेहता...' फेम दयाबेन हिच्या मुलाची पहिली झलक; गोंडस दिसतो Disha Vakani चा लेक
Disha Vakani
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 4:59 PM

Disha Vakani : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (taarak mehta ka ooltah chashmah) मालिका गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. मालिकेने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. मालिकेतील प्रत्येक भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. मालिकेतील टप्पू सेनेची मस्ती आणि गोकुळ धाम सोसायटीमधील एकीमुळे मालिका चाहत्यांमध्ये चर्चेत असते. गेल्या काही दिवसांमध्ये मालिकेत अनेक बदल झाले. पण तरी देखील मालिकेवर असलेलं प्रेक्षकांचं प्रेम कमी झालेलं नाही. मधल्या काळात अनेकांनी मालिकेचा निरोप घेतला. पण मालिकेत सक्रिय नसताना देखील कलाकार चाहत्यांमध्ये चर्चेत आहेत. शिवाय मालिकेत ते पुन्हा येतील असा अंदाज देखील व्यक्त करण्यात येतो.

मालिकेत दयाबेन म्हणजे अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) आजही चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. एवढंच नाही तर, मालिकेत पुन्हा येण्यासाठी चाहते सतत मागणी करताना दिसत आहेत. दिशा सध्या झगमगत्या दुनियेपासून दूर कुटुंबासोबत आनंदात आयुष्य जगत आहे. अभिनेत्रीचे फोटो मात्र सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. आता दिशाचा कुटुंबासोबत एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिशा पती मयूर आणि दोन मुलांसोबत मंदिरात पूजा करताना दिसत आहे. हा व्हिडीओ महाशिवरत्रीचा असल्याचं कळत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे. व्हिडीओमध्ये दिशाच्या मुलाची पहिली झलक दिसत आहे. दिशाचा मुलगा प्रचंड गोंडस दिसत आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहते दिशाच्या मुलाचं कौतुक करताना दिसत आहे. तर दुसरीकडे काही चाहते भावुक होत अभिनेत्रीला पुन्हा मालिकेत येण्यासाठी विनंती करत आहेत. व्हिडीओवर कमेंट करत चाहते म्हणाले, ‘प्लिज मालिकेत पुन्हा या…’ तर अन्य एक चाहता म्हणाला, ‘मालिकेत पुन्हा या… तुमच्या शिवाय मालिका अधुरी आहे…’ सध्या सर्वत्र दिशा वकानीच्या व्हिडीओची चर्चा आहे.

दिशा हिने २०१७ मध्ये मालिकेतून ब्रेक घेतला. त्यानंतर अभिनेत्री कधीही पुन्हा मालिकेत दिसली नाही. नुकताच दिग्दर्शक असित मोदी यांनी दिशा वकानी मालिकेत पुन्हा येणार नसून दयाबेन नक्की मालिकेत पुन्हा येईल. घोषणा केली. पण सध्या सर्वत्र अभिनेत्री आणि मुलाची चर्चा रंगत आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.