AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तारक मेहता..’च्या सोनूने लग्नाच्या दीड वर्षातच दिली गुड न्यूज? पहा व्हिडीओ

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत सोनू भिडेची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री झील मेहताने नुकतीच चाहत्यांना 'गुड न्यूज' दिली आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'तारक मेहता..'च्या सोनूने लग्नाच्या दीड वर्षातच दिली गुड न्यूज? पहा व्हिडीओ
अभिनेत्री झील मेहता आणि तिचा पतीImage Credit source: Instagram
| Updated on: May 06, 2026 | 10:47 AM
Share

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. गेल्या 17 ते 18 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून यातील प्रत्येक कलाकार घराघरात पोहोचला आहे. यामध्ये सोनू भिडेची भूमिका अनेकदा बदलली, तरीही ही भूमिका साकारणारी प्रत्येक अभिनेत्री प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. सर्वांत आधी या मालिकेत सोनूची भूमिका साकारलेली अभिनेत्री झील मेहता सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. झीलने डिसेंबर 2024 मध्ये आदित्य दुबेशी लग्न केलं होतं. आता लग्नाच्या दीड वर्षांनंतर तिने चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे. झीलने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओची सुरुवात पाहून तुम्हालाही असंच वाटेल की झील प्रेग्नंट आहे. पण थांबा.. यात मोठा ट्विस्ट आहे.

झीलने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओच्या सुरुवातीला तिचं पोट दिसून येत आहे. गरोदरपणात जोडपं फोटोसाठी जसा पोझ देतात, तशीच ही पोझ असल्याने चाहत्यांना ‘गुड न्यूज’चा अर्थ प्रेग्नंसी असल्याचं वाटलं. परंतु या व्हिडीओच्या पुढे झीलने खुलासा केला की, ती प्रेग्नंट नसून ‘गुड न्यूज’ त्यांच्या नव्या घराबद्दलची आहे. यानंतर झील आणि आदित्य घराची चावी दाखव आनंद व्यक्त करतात. सहसा लग्नानंतर ‘गुड न्यूज’ कधी देणार, असा प्रश्न जोडप्यांना सतत विचारला जातो. असा प्रश्न विचारणाऱ्यांना झीलने गमतीशीर पद्धतीने उत्तर दिलं आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

झीलने 2008 मध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत सोनू भिडेची भूमिका साकारली होती. 2012 पर्यंत ती या मालिकेत काम करत होती. त्यानंतर शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिने ही मालिका सोडली. झील तेव्हापासून अभिनयक्षेत्रापासून दूरच आहे. ती सध्या स्टुडंट हाऊसिंग नावाची कंपनी चालवते. ती तिच्या आईसोबत ब्युटी बिझनेसमध्येही काम करते. तर झीलचा पती आदित्य हा गेमिंग इंडस्ट्रीत काम करतो. झीलने शिक्षण पूर्ण करण्यासाठी मालिकेचा निरोप घेतला होता. मात्र तिने साकारलेली सोनूची भूमिका आजही लोकप्रिय आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा