TMKOC: ‘तारक मेहता..’च्या चाहत्यांना लवकरच मिळणार गुड न्यूज; लोकप्रिय पात्रं मालिकेत परतणार?

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

Updated on: Nov 30, 2022 | 12:42 PM

'तारक मेहता..'मध्ये पुन्हा होणार 'या' कलाकाराची एण्ट्री? दिग्दर्शकांनी दिली हिंट

TMKOC: 'तारक मेहता..'च्या चाहत्यांना लवकरच मिळणार गुड न्यूज; लोकप्रिय पात्रं मालिकेत परतणार?
TMKOC
Image Credit source: Instagram

मुंबई: छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 14 वर्षांनंतरही या मालिकेची लोकप्रियता अजूनही कायम आहे. मात्र गेल्या काही महिन्यांत काही कलाकारांनी ही मालिका सोडली. यामध्ये तारक मेहताची भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांचाही समावेश होता. मालिकेच्या चाहत्यांसाठी हा खूप मोठा धक्का होता. मात्र आता शैलेश यांची मालिकेत पुन्हा एण्ट्री होणार असल्याचं कळतंय.

शैलेश यांनी ‘तारक मेहता..’ मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदा यांच्यासोबतचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ‘मेहता साहब यांना सोडून बाकी सगळ्यांचं पॅक-अप असं म्हणून या एका व्यक्तीला मी मालिकेच्या सेटवर खूप त्रास दिला आहे’, असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malav Rajda (@malavrajda)

शैलेश आणि दिग्दर्शकांसोबतच त्यांचे इतरही मित्र या फोटोत पहायला मिळत आहेत. या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. शैलेश यांना मालिकेत परत आणण्याची विनंती ते दिग्दर्शकांकडे करत आहेत.

का सोडली मालिका?

शैलेश लोढा हे मालिकेच्या कराराबाबत खूश नव्हते. मालिकेच्या वेळापत्रकाशी संबंधित समस्या असल्याने त्यांनी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. निर्मात्यांनी त्यांना मालिकेत थांबवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ते आपल्या निर्णयावर ठाम होते. गेल्या काही वर्षांत या मालिकेतून दया बेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी, अंजली भाभीची भूमिका साकारणारी नेहा मेहता यांनी निरोप घेतला.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI