आता तुमच्या मुलांसोबत 'तैमूर'ही खेळायला येणार

मुंबई : सैफ अली खान-करीना कपूरचा मुलगा तैमूर अली खान याची पॉप्युलॅरीटी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सोशल मिडीयावर नेहमी ट्रेंड करणाऱ्या तैमूरची एक झलक बघण्यासाठी त्याचे चाहते आतुरलेले असतात. सध्या बाजारात तैमुरच्या नावाची खेळणी आली आहे. तैमूरचा गोंडस चेहरा लोकांना इतका आवडायला लागला आहे की, आता कंपन्या त्याच्यासारखी खेळणी बनवायला लागली आहेत. तैमूरच्या खेळणीचा फोटो …

आता तुमच्या मुलांसोबत 'तैमूर'ही खेळायला येणार

मुंबई : सैफ अली खान-करीना कपूरचा मुलगा तैमूर अली खान याची पॉप्युलॅरीटी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सोशल मिडीयावर नेहमी ट्रेंड करणाऱ्या तैमूरची एक झलक बघण्यासाठी त्याचे चाहते आतुरलेले असतात. सध्या बाजारात तैमुरच्या नावाची खेळणी आली आहे.

तैमूरचा गोंडस चेहरा लोकांना इतका आवडायला लागला आहे की, आता कंपन्या त्याच्यासारखी खेळणी बनवायला लागली आहेत. तैमूरच्या खेळणीचा फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतो आहे.


केरळमधील खेळणी बनविणाऱ्या कंपनीने तैमूरचा हुबेहुब बाहुला तयार केला आहे. पांढऱ्या रंगाचा कुर्ता, नेव्ही ब्ल्यू रंगाच जॅकेट आणि पॅंट असा या तैमूर बाहुल्याचा ड्रेस आहे.

नुकतच काही दिवसांपूर्वी सैफ अली खान मुलगी सारासोबत करण जौहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात गेला होतो. तेव्हा त्याला तैमूरबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्याने सांगितले की, तैमूरचाजो फोटो सोशल मिडीयावर येतो त्या एका फोटोची किंमत 1500 रुपये असते.

यावरुन आपण अंदाज लावू शकतो की तैमूरची लोकप्रियता किती असेल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *