विराटसोबत होतं तमन्नाचं अफेअर? एका फोटोने उडाली होती खळबळ; पहिल्यांदाच सोडलं मौन

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीनंतर बॉलिवूडमध्येही आपली विशेष ओळख निर्माण करणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. तमन्नाचं नाव भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रझाक यांच्याशीही जोडलं गेलं होतं.

विराटसोबत होतं तमन्नाचं अफेअर? एका फोटोने उडाली होती खळबळ; पहिल्यांदाच सोडलं मौन
तमन्ना भाटिया, विराट कोहली
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 04, 2025 | 8:44 AM

अभिनेत्री तमन्ना भाटियाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमध्ये आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. सौंदर्य, डान्स आणि अभिनयाच्या जोरावर तिने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. तमन्ना तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. गेल्या काही महिन्यांपासून ती अभिनेता विजय वर्माला डेट करत होती. परंतु या दोघांचा आता ब्रेकअप झाला आहे. विजयच्या आधी तमन्नाचं नाव भारतीय क्रिकेटर विराट कोहली, पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रझाक यांच्याशीही जोडलं गेलं होतं. अफेअरच्या या चर्चांवर पहिल्यांदाच तमन्नाने मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्ना म्हणाली, “मला याविषयी फार वाईट वाटतं. कारण मी त्याला फक्त एकदाच शूटिंगनिमित्त भेटली होती. शूटिंगनंतर आम्ही पुन्हा कधी भेटलोसुद्धा नव्हतो. आमचं फार कधी बोलणंही झालं नव्हतं. मी विराटला नंतर कधीच भेटली नाही. आमचा जो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, तो त्या शूटिंगदरम्यानचा होता. आम्ही त्यात फक्त कामाविषयी एकमेकांशी बोलत होतो. परंतु लोकांनी त्याचा उलटा अर्थ काढला.” तमन्ना आणि विराट यांनी एका जाहिरातीत एकत्र काम केलं होतं. 2010 च्या सुरुवातीला ही शूटिंग झाली होती आणि सेटवरील दोघांचा एक फोटो व्हायरल झाला होता.

तमन्नाच्या खासगी आयुष्याबद्दल दुसरी अफवा म्हणजे तिने माजी पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रझाकशी गुपचूप लग्न केलं होतं. या दोघांना एका दागिन्यांच्या दुकानात एकत्र पाहिलं गेलं होतं. तेव्हापासून त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर तमन्ना म्हणाली, “होय, इंटरनेटवर विश्वास ठेवला तर मी थोड्या वेळासाठी अब्दुल रझाकशी लग्न केलं होतं. मला माफ करा, त्यांची दोन-तीन मुलं आहेत. त्यांच्या आयुष्याबद्दल मला काहीच माहीत नाही. परंतु या अफवा अत्यंत लज्जास्पद आहेत. आमचा जो फोटो व्हायरल झाला होता, तो एका ज्वेलरी स्टोअरच्या लाँचदरम्यानचा होता. त्याठिकाणी आम्ही दोघं योगायोगाने एकत्र उपस्थित होतो.”

“हे खूपच विचित्र आहे. जिथे काहीच संबंध नसतो, तिथे लोक नाव जोडतात. यावर तुम्ही काहीच करू शकत नाही. या गोष्टींचा स्वीकार करण्यासाठी थोडा वेळ लागतो. यात तुम्ही काहीच करू शकत नाही, हे स्वीकारायला वेळ लागतो. ज्या व्यक्तीला जसा विचार करायचा असतो, तो तसाच करतो. तुम्ही प्रत्येकाला नियंत्रित करू शकत नाही. त्यामुळे या गोष्टींकडे मी आता विनोदाच्या दृष्टीकोनातून बघते”, असं तिने स्पष्ट केलं.

तमन्ना भाटियाने हिंदीसोबतच तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलंय. 2005 मध्ये तिने ‘चांद सा रोशन चेहरा’ या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर 2015 मध्ये ‘बाहुबली : द बिगनिंग’ या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली.