AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बिग बॉस 17’मधील या स्पर्धकाला तडकाफडकी काढलं घराबाहेर; कारणंही तितकंच मोठं

'बिग बॉस 17'मधील एका स्पर्धकाला तडकाफडकी घराबाहेर काढण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. यामागचं कारणंही तसं आहे. नेटकऱ्यांनीही त्या स्पर्धकावर कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियावर केली होती. त्यानंतर आता वीकेंड का वार एपिसोडमध्ये त्या निर्णयाची घोषणा होणार आहे.

'बिग बॉस 17'मधील या स्पर्धकाला तडकाफडकी काढलं घराबाहेर; कारणंही तितकंच मोठं
Salman KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 01, 2023 | 11:38 AM
Share

मुंबई : 1 डिसेंबर 2023 | ‘बिग बॉस 17’ हा शो प्रीमिअर एपिसोडपासून चांगलाच चर्चेत आहे. सलमान खान सूत्रसंचालन करत असलेला हा शो प्रेक्षकांचं भरभरून करतोय. या शोच्या प्रत्येक एपिसोडमध्ये नवीन ड्रामा, नवीन वाद पहायला मिळतोय. यात काही स्पर्धक त्यांची मर्यादा ओलांडून वागतानाही दिसत आहेत. अशाच एका स्पर्धकावर बिग बॉसने तडकाफडकी कारवाई केली आहे. या स्पर्धकाला थेट घराबाहेर काढलं गेलंय. सनी आर्या ऊर्फ तहलका भाईवर ही कारवाई करण्यात आली आहे. असं करण्यामागचं कारणंही तितकंच मोठं आहे.

नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये अभिषेक कुमार आणि अरुण माशेट्टी यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर सनी आर्या ऊर्फ तहलकाने त्याचा मित्र अरुणला पाठिंबा दिला आणि तोसुद्धा वादात सहभागी झाला. मात्र हा वाद जेव्हा मारहाणीपर्यंत पोहोचला, तेव्हा मात्र बिग बॉसला हस्तक्षेप करावाच लागला. भांडणादरम्यान सनीचा स्वत:वरील ताबा सुटला आणि त्याने थेट अभिषेकला मारायला सुरुवात केली. तहलकाने अभिषेकचं कॉलर पकडताच घरातील इतर स्पर्धकांनी दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

तहलका भाई आणि अभिषेकमधील या भांडणानंतर बिग बॉस काय कारवाई करणार, असा प्रश्न नेटकऱ्यांकडून विचारला जात होता. मात्र आता बिग बॉसने सनी आर्याला थेट घराबाहेर काढल्याचं समजतंय. या आठवड्यातील ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये निर्माता-दिग्दर्शक करण जोहर सनीच्या शिक्षेची घोषणा करणार आहे. सनी आर्याचा बिग बॉसमधील प्रवास इथेच संपवण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. याआधीही सनीला त्याच्या आक्रमक वागणुकीमुळे बिग बॉसकडून इशारा देण्यात आला होता. गेल्या आठवड्यात सूत्रसंचालक सलमान खानने सनी आर्याची चांगलीच शाळा घेतली होती. एका टास्कदरम्यान सनीने अभिषेकला टार्गेट केलं होतं आणि महिला स्पर्धकांबद्दल अपशब्द वापरले होते. यामुळे सलमानने त्याला सुनावलं होतं.

तहलका भाई-अभिषेकमधील भांडण

तहलका भाई आणि अभिषेक कुमार यांच्यातील भांडणाची सुरुवात अरुणपासून झाली. अरुण ‘दिल’ रुममध्ये इशा मालवीय आणि समर्थ जुरेल यांना उठवायला गेला होता. यावेळी इशा आणि अरुण यांच्यात शाब्दिक वादावादी झाली. या वादात इशाचा एक्स बॉयफ्रेंड अभिषेकने उडी घेतली. त्याने अरुणला इशाशी नीट बोलण्याचा इशारा दिला. मात्र ही गोष्ट अरुणला आवडली नाही. अरुण आणि अभिषेकच्या या वादात नंतर अरुणचा खास मित्र तहलका भाईने उडी घेतली. या भांडणापासून लांब राहण्याचा सल्ला त्याने अभिषेकला दिला. याचवेळी तहलकाचा राग अनावर होतो आणि तो अभिषेकची कॉलर पकडतो.

...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.