AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबा, तुमची सगळी स्वप्नं मी पूर्ण करेन…; राष्ट्रवादीत प्रवेश करताच अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

Ashvini Mahangade Enter in NCP Sharad Pawar Group : अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने राष्ट्रवादी शरद पवार प्रवेश केला आहे. त्यानंंतर अश्विनीने एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केलीय. यात तिने तिच्या बाबांविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. वाचा सविस्तर...

बाबा, तुमची सगळी स्वप्नं मी पूर्ण करेन...; राष्ट्रवादीत प्रवेश करताच अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
अश्विनी महांगडे, अमोल कोल्हेImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 17, 2024 | 9:42 AM
Share

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने राजकारण एन्ट्री केली आहे. अश्विनीने राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत अश्विनीने राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. पक्ष प्रवेशानंतर अश्विनीने एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिच्या वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. नाना…. तुमची सगळी स्वप्नं मी पूर्ण करेन.. जबाबदारीने…, असं अश्विनी म्हणाली आहे. माझे वडील पण शरद पवारांच्या नेतृत्वात काम करत होते, असं अश्विनी महांगडे हिने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Asʜvɪɴɪ Pʀᴀᴅɪᴘᴋᴜᴍᴀʀ Mᴀʜᴀɴɢᴀᴅᴇ (@ashvinimahangade)

अश्विनी महांगडेची पोस्ट

माझे वडील स्व. प्रदीपकुमार महांगडे (नाना) यांनी कायम मा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केले. अगदी गावातल्या निवडणुकांपासून ते लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात अगदी झोकून देवून ते काम करायचे. जेवायला बसल्यावर चर्चा सुद्धा त्याच. राजकारण हा त्यांचा आवडता विषय. लोकांच्या मदतीला धावून जाणे हे रक्तातच होते त्याच्या. त्यांना कायम कार्यकर्ता बनून राहायला आवडायचे.

पण साधारण 4 वर्षांपूर्वी त्यांना जाणवले की #ताई (मी) समाजासाठी काम करू शकते, त्यांच्यासाठी उभी राहू शकते आणि पक्षाने जबाबदारी दिली तर काम करण्याचा आवाका वाढेल. हे त्यांचे स्वप्न अर्थात 4 वर्षानंतर आज #कोजागिरी_पौर्णिनेच्या मुहूर्तावर पूर्ण झाले. ही नवीन जबाबदारी मला अजून घडवेल. समाजासाठी काम करायची जाणीव सतत करून देईल. स्वीकारलेले काम जबाबदारीने पूर्ण करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. यात अनेक लोकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा होत्या म्हणून हे शक्य झाले. त्यांचे आभार..

#राष्ट्रवादी_काँग्रेस_पक्ष_शरदचंद्र_पवार यांनी #महाराष्ट्र_प्रदेश_नॅशनॅलिस्ट_महिला_काँग्रेस_पार्टी_-_शरदचंद्र_पवार_पार्टीच्या #उपाध्यक्ष_पदी_नियुक्ती_केली त्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे.

मा. शरदचंद्र जी पवार साहेब, मा. सुप्रियाताई सुळे, मा. जयंत पाटील, मा. अमोल दादा कोल्हे, मा. बाळासाहेब पाटील, मा. शशिकांत शिंदे, मा. मेहबूब शेख तसेच माझ्यावर प्रचंड प्रेम करणारे आमचे मा. प्रसाद काका सुर्वे, मा. डॉ. नितीन सावंत, मा. राजकुमार पाटील, मा. बाबर, मा.संतोष पवार यांची ऋणी आहे.

#ashvini_mahandage

#राजकारणातून_घडेल_समाजकार्य

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.