Arrest Yuvika Choudhary | अटकेच्या भीतीने घाबरली युविका चौधरी, सोशल मीडियावर पोस्ट लिहित मागितली माफी!

अभिनेत्री युविका चौधरी (Yuvika Choudhary) हिला आपला नवा व्हिडीओ शेअर करणे खूपच महागात पडले आहे. तिने सोशल मीडियावर एक व्लॉग शेअर केला होता, ज्यामध्ये तिने जातीवादी अपशब्द शब्द वापरला होता. ज्यानंतर सोशल मीडियावर युविकाला अटक करण्याची मागणी होत होती.

Arrest Yuvika Choudhary | अटकेच्या भीतीने घाबरली युविका चौधरी, सोशल मीडियावर पोस्ट लिहित मागितली माफी!
युविका चौधरी

मुंबई : अभिनेत्री युविका चौधरी (Yuvika Choudhary) हिला आपला नवा व्हिडीओ शेअर करणे खूपच महागात पडले आहे. तिने सोशल मीडियावर एक व्लॉग शेअर केला होता, ज्यामध्ये तिने जातीवादी अपशब्द शब्द वापरला होता. ज्यानंतर सोशल मीडियावर युविकाला अटक करण्याची मागणी होत होती. अटकेची मागणी ऐकून युविका चौधरी चिंताग्रस्त झाली आहे आणि तिने तातडीने एक पोस्ट शेअर करुन सर्वांची माफी मागितली आहे (Actress Yuvika Choudhary share sorry post after trending Arrest Yuvika Choudhary on social media).

युविकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहेत. या पोस्टमध्ये तिने लिहिले, ‘हाय फ्रेंड्स, मी माझ्या शेवटच्या व्लॉगमध्ये वापरलेल्या शब्दाचा अर्थ मला माहित नव्हता. मला कुणालाही दुखवायचं नव्हतं किंवा मी हे असं काही करु इच्छित नाही. मी तुम्हा सर्वांसमोर दिलगिरी व्यक्त करते. आशा आहे की, आपणा सर्वांना समजले असेल. तुम्हा सगळ्यांवर खूप खूप प्रेम.’

पाहा युविका चौधरीची पोस्ट

युविकाच्या या पोस्टनंतर अनेक सेलेब्स तिच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. युविकाच्या पोस्टवर तिचा नवरा प्रिन्स नरुला यांने देखील कमेंट केली की, ‘चुकून झालेली चूक आहे. काळजी करू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे आणि तू क्षमा मागितली आहे, म्हणूनच मी तुझ्यावर प्रेम करतो.’ (Actress Yuvika Choudhary share sorry post after trending Arrest Yuvika Choudhary on social media)

युविकाने चुकून वापरला जातीवाचक शब्द

युविकाने सोशल मीडियावर एक व्लॉग शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा पती प्रिन्स नरुला आपले केस कापून घेताना दिसत असून, अंगावर कापड घेऊन बसला आहे. तर, युविका घरभर फिरून एक व्हिडीओ बनवत आहे. व्हिडीओ बनवताना युविका म्हणते की, ‘जेव्हा जेव्हा मी व्लॉग बनवते, तेव्हा मी येऊन ** सारखी का उभी राहते? मला स्वत:ला तयार करण्यासाठी पुरेसा वेळ देखील मिळत नाही. मी खूप बेकार दिसत आहे आणि प्रिन्स मला तयार होण्यास वेळ देत नाही.’

युविकाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि #ArrestYuvikaChodhhary ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला. बरेच लोक युविकावर मीम्स शेअर करत होते.

युविकाआधी मुनमुन दत्ता ट्रोल

अलीकडेच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील ‘बबिता जी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) हीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये तिने जातीवाचक अपमानास्पद शब्द वापरला होता. यानंतर तिच्यावर कारवाई करण्याची जोरदार मागणी झाली होती. यानंतर तिच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.

(Actress Yuvika Choudhary share sorry post after trending Arrest Yuvika Choudhary on social media)

हेही वाचा :

सलमानच्या ‘Radhe’ची पायरसी कराल तर खबरदार! निलंबित केला जाणार व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक, दिल्ली हायकोर्टाचा निर्णय!

Devmanus | ‘देवमाणूस’ डिंपलसोबत विवाहबंधनात, लग्नात दिव्याचा खोडा की सरु आजीचा राडा?

Arrest Yuvika Choudhary | युविका चौधरीनेही उच्चारला ‘तोच’ जातीवाचक शब्द, ‘बबिता’नंतर आता युविका वादात!

Published On - 2:28 pm, Tue, 25 May 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI