Raju Srivastav : 15 दिवसानंतर राजू श्रीवास्तव शुद्धीवर, ‘या’ पाच शब्दाने कुटुंबियांना अन् असंख्य फॅन्सला दिलासा

राजेंद्र खराडे

राजेंद्र खराडे |

Updated on: Aug 25, 2022 | 3:35 PM

गेल्या 15 दिवसांपासून राजू श्रीवास्तव याच्यावर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत त्याच्या तब्येतीवरुन वेगवेगळ्या बातम्या समोर आल्या होत्या शिवाय उपचाराला प्रतिसाद नसल्याने त्याचे कुटुंबीय आणि फॅन्स हे चिंतेत होते. मात्र, शुद्धीवर येताच त्यांनी आपल्या पत्नीला जे पाच शब्द बोलले आहेत त्यामुळे आता सर्वकाही सुरळीत होईल असे चित्र आहे.

Raju Srivastav : 15 दिवसानंतर राजू श्रीवास्तव शुद्धीवर, 'या' पाच शब्दाने कुटुंबियांना अन् असंख्य फॅन्सला दिलासा
Raju Srivastava
Image Credit source: Twitter

मुंबई : विनोदाचा बादशाह असलेला (Raju Srivastav) राजू श्रीवास्तव गेल्या 15 दिवसांपासून (Battling with death) मृत्यूशी झुंज देत आहे. बरोबर 15 दिवसांपूर्वी राजू श्रीवास्तव हा जीममध्ये व्यायाम करीत असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्याला बेशुद्ध अवस्थेत त्यांना तात्काळ दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांना (Ventilator) व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तेव्हापासून त्याच्या चाहत्यांनी देव पाण्यात ठेऊन त्याच्यासाठी प्रार्थना केली होती. अखेर 15 दिवसानंतर तो शुद्धीवर आला असून त्याने उच्चारलेल्या 5 शब्दाने कुटुंबियांना तर दिलासा मिळाला आहेच पण जगभरातील त्याच्या फॅन्सची प्रार्थना आता कामी आली अशीच भावना प्रत्येकाची आहे.

शुद्धीवर आल्यावर काय म्हणाला राजू श्रीवास्तव?

गेल्या 15 दिवसांपासून राजू श्रीवास्तव याच्यावर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत त्याच्या तब्येतीवरुन वेगवेगळ्या बातम्या समोर आल्या होत्या शिवाय उपचाराला प्रतिसाद नसल्याने त्याचे कुटुंबीय आणि फॅन्स हे चिंतेत होते. मात्र, शुद्धीवर येताच त्यांनी आपल्या पत्नीला जे पाच शब्द बोलले आहेत त्यामुळे आता सर्वकाही सुरळीत होईल असे चित्र आहे. त्यांनी आपल्या पत्नीला जवळ घेऊन मी ठीक आहे..असे म्हणताच त्याच्या कुटुंबियांचा आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा आनंद गगणात मावेना झाला होता. यानंतर अशोक मिश्रा म्हणाले की, त्याच्या या हालचालीमुळे आपण तर आनंदाने उडीच मारली, एवढेच नाहीतर आपण कोठे आहोत? कोण आहोत? असे विचारले असता त्याला सर्वकाही समजत असल्याचे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते.

गुड न्यूज..राजू भाई शुद्धीवर आले

राजू श्रीवास्तव हे शुद्धीवर आल्यानंतर जसा त्यांच्या कुटुंबियांना आनंद झाला तसाच चाहते आणि मित्र परिवारालाही झाला आहे. ही आनंदाची बातमी समजताच सुनील पाल यांनी तर म्हटले आहे की, “गुड न्यूज़ लोग… राजू भाई शुद्धीवर आले आहेत. थैंक्स गॉड..एवढेच नाही तर असा चमात्कार घडेल याचा विश्वासही होते असे त्यांनी सांगितले आहे. देव हसणाऱ्याचा कधीच अवमान करु शकत नाही.त्यामुळे तुम्ही हजारो वर्ष जगणार अशी आशाही पाल यांनी व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

वेगळ्या अदाकरीने राजू श्रीवास्तव चाहत्यांच्या मनात

विनोदाचा बादशाह म्हणून राजू श्रीवास्तव यांची ओळख आहे. विनोद आणि तो ही इतक्या सहजतेनेकी चाहत्यांना बुचकळ्यात पडल्यासारखे वाटणार नाही हे वैशिष्ट राजू श्रीवास्तव यांचे राहिलेले आहे. त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्यी टीव्ही कार्यक्रमातून प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत. त्यांची सजगता, हजरजबाबीपणा हा प्रेक्षकांना आकर्षित कऱणारा राहिलेला आहे. त्यामुळे त्यांचा चाहता वर्गही जास्त आहे. मात्र, गेल्या 15 दिवसांपासून ते मृत्यूशी झुंज देत आहेत. अखेर 25 ऑगस्ट रोजी ते शुद्धीवर आले आहेत. त्याच्या प्रकृतीमध्ये अशीच सुधारणा होत राहो अशी प्रार्थना चाहत्यांची आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI